India vs New Zealand, 3rd T20I : भारतीय संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि तिसरा सामना आज कोलकाताच्या इडन गार्डवर होणार आहे. भारतीय संघ शनिवारीच रांचीहून कोलकाता येथे दाखल झाला आणि खेळाडू थेट हॉटेलमध्ये गेले. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) विमानतळावरून थेट इडन गार्डनवर पोहोचला. त्याच्या या कृतीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, परंतु पुन्हा एका 'Mr Perfectionist' पाहायला मिळाल्यानं आनंदही झाला. न्यूझीलंडवर निर्भळ यश मिळवण्याचा द्रविडनं पक्का निर्धार केला आहे आणि त्यासाठी तो कोणतीच कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये गेले असताना राहुलनं इडन गार्डनवर जाऊन क्युरेटरशी चर्चा केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs NZ, 3rd T20I : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविड विमानतळावरून थेट इडन गार्डनवर; कारण जाणून वाटेल अभिमान
IND vs NZ, 3rd T20I : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविड विमानतळावरून थेट इडन गार्डनवर; कारण जाणून वाटेल अभिमान
India vs New Zealand, 3rd T20I : भारतीय संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि तिसरा सामना आज कोलकाताच्या इडन गार्डवर होणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 15:47 IST