Join us

IND vs NZ, 3rd T20I Live : ७ चेंडूंत ३४ धावा! राहुल त्रिपाठीची अतरंगी फटकेबाजी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, Video 

India vs New Zealand, 3rd T20I Live : इशान किशन दुसऱ्याच षटकात माघारी परतला तरी भारताने सामन्यावर चांगली पकड घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:57 IST

Open in App

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या तीन ट्वेंटी-२० सामन्यातील निर्णायक सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशन दुसऱ्याच षटकात माघारी परतला तरी भारताने सामन्यावर चांगली पकड घेतली आहे. राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि शुभमन गिल यांनी ८०धावांची भागीदारी करताना १० षटकांत फलकावर शतकी आकडा चढवला. राहुलने मारलेले स्कूप पाहून न्यूझीलंडचे गोलंदाज डोकं पकडून बसले.   

बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video 

प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या पथ्यावर काही पडला नाही. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला. ब्रेसवेलने टाकलेला चेंडू इशानला समजला नाही अन् तो पॅडवर आदळला.. LBW ची जोरदार अपील झाले अन् मैदानावरील अम्पायरने OUTचा हात उचलला. त्यानंतर शुभमन गिलशी चर्चा करून इशानने DRS घेतला. त्यात चेंडू बॅड अन् पॅड यांच्या जवळून जाताना एकाच वेळी अल्ट्रा एजमध्ये रेषा वरखाली होताना दिसल्या. तिसऱ्या अम्पायरने मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. इशानला १ धावेवर माघारी जावे लागले.  

राहुल त्रिपाठी व शुभमन यांनी चांगली फटकेबाजी करून २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. शुभमनला ३४ धावांवर जीवदान मिळाले. राहुलने काही सुरेख फटके मारले. लौकी फर्ग्युसनला त्याने मारलेला उत्तुंग षटकार पाहण्यासारखा होता. ९व्या षटकात त्याने इश  सोढीलाही खणखणीत षटकार मारला अन् दुसरा चेंडूही स्वीपद्वारे सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा प्रयत्न फसला अन् फर्ग्युसनने झेल घेतला. राहुल २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला अन् शुभमनसह त्याची ४२ चेंडूंतील ८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडइशान किशनशुभमन गिल
Open in App