India vs New Zealand, 3rd T20I : गुवाहटीच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मॅच विनर अर्शदीप सिंगसह वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली असून जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. बुमराह हा आगामी टी-२० वर्ल्ड कपचा भाग आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण तिसऱ्या सामन्यात सूर्यानं केलेला दुसरा बदल हा आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी रवी बिश्नोईची संघात एन्ट्री होणार याचे संकेत देणारा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वॉशिंग्टन सुंदर वर्ल्ड कप स्पर्धेतून OUT? रवी बिश्नोईला लागणार 'लॉटरी'
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत वॉशिंग्टन सुंदर हा दुखापतग्रस्त झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याच्या जागी रवि बिश्नोईला बदली खेळाडूच्या रुपात संधी मिळाली. तिसऱ्या सामन्यात टी-२० क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या वरुण चक्रवर्तीला विश्रांती देत सूर्यानं बिश्नोईला आजमावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बिश्नोई हा वॉशिंग्टनच्या जागी खेळताना दिसेल त्याची एक हिंटच आहे.
ICC World Cup, IND vs PAK : ठरलं! टी-२० आधी वनडे वर्ल्ड कपमध्ये रंगणार भारत-पाक हायहोल्टेज सामना
भारत प्लेइंग इलेव्हन :
संजू सॅमसन (यष्टीरक्षक/फलंदाज), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन :
डेवॉन कॉनवे, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक फलंदाज), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी.
Web Summary : India considers changes before the T20 World Cup, hinted by Suryakumar's team selection in the New Zealand match, potentially favoring Ravi Bishnoi over Washington Sundar.
Web Summary : न्यूजीलैंड के खिलाफ मैच में सूर्यकुमार द्वारा टीम चयन से संकेत मिलता है कि भारत टी20 विश्व कप से पहले बदलाव पर विचार कर रहा है, संभवत: रवि बिश्नोई को वाशिंगटन सुंदर पर तरजीह दी जा सकती है।