Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेवॉन कॉन्वेसमोर हर्षित राणाचा ‘बाणा’; हार्दिक पांड्यानं घेतला डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच (VIDEO)

हार्दिक पांड्याचा अफलातून झेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 20:29 IST

Open in App

गुवाहटीच्या मैदानातील सामन्यातही हर्षित राणाने न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वेसमोर आपल्या गोलंदाजीचा धाक कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर हर्षित राणानं भारताच्या डावाची सुरुवात केली. आपल्या पहिल्याच षटकात त्याने डेवॉन कॉन्वेला पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पाचव्यांदा हर्षित राणाने डेवॉन कॉन्वेची शिकार केल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! हर्षित राणासमोर डेवॉन कॉन्वेची डाळ शिजेना!

टी-२० मालिकेआधी झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात हर्षित राणाने डेवॉन कॉन्वेची विकेट घेतली होती. पहिल्या टी-२० सामन्यात हर्षित राणा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पण पुन्हा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यावर दोन्ही सामन्यात पुन्हा त्याने कॉन्वेला तंबूचा रस्ता दाखवल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर डेवॉन कॉन्वेनं हवेत चेंडू मारला अन् हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल घेत त्याचा खेळ खल्लास केला.   

IND vs NZ 3rd T2OI : जसप्रीत बुमराहचं जबरदस्त कमबॅक! Tim Seifert चा अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम'! (VIDEO) हार्दिक पांड्याचा अफलातून झेल

हर्षित राणाने पाचव्यांदा  डेवॉन कॉन्वेला तंबूचा रस्ता दाखवला असला तरी यावेळी त्याच्या खात्यात जी विकेट मिळाली त्याचं सगळं श्रेय  हार्दिक पांड्यालाच द्यावे लागेल. डावाच्या पहिल्याच षटकातील  तिसऱ्या चेंडूवर कॉन्वेनं पुढे येऊन कव्हरच्या दिशेनं चेंडू मारला. पण टायमिंग जुळलं नाही. हवेत उडालेला चेंडू मिड-ऑफच्या दिशेने गेला. तिथं क्षेत्ररक्षण करत असलेल्या हार्दिक पांड्याने हवेत झेपावत डोळ्याच पारण फेडणारा झेल टिपत क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजारा दाखवून दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Harshit Rana Dismisses Conway Again; Hardik Pandya Takes Stunning Catch

Web Summary : In Guwahati, Harshit Rana dismissed Devon Conway, continuing his dominance. Hardik Pandya took a spectacular catch off Conway's shot. Rana has dismissed Conway five times in the series. Pandya's catch was a highlight.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडहर्षित राणाहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ