Join us

Washington Sundar Shreyas Iyer, IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन 'सुंदर' झुंजला, ५ बाद १२५ वरून भारताचा डाव सावरला; रिषभ पुन्हा फेल झाला

वॉशिंग्टन सुंदरसह श्रेयस अय्यरनेही केली झुंजार खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 11:11 IST

Open in App

Washington Sundar Shreyas Iyer, IND vs NZ 3rd ODI: 'करो या मरो'ची स्थिती असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारताचा पहिला डाव २१९ धावांवर आटोपला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले नाही. वॉशिंग्टन सुंदरचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या ४९ धावांच्या जोरावर भारताने कशीबशी २००पार मजल मारली. शिखर धवन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत या खेळाडूंनी चाहत्यांची निराशा केली.

सलामीसाठी उतरलेल्या शुबमन गिल आणि शिखर धवनने ३९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिल केवळ १३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्यात भागीदारी होण्यास सुरूवात झाली होती. त्याच वेळी धवन माघारी परतला. तसे असले तरी श्रेयस अय्यरने चांगली फलंदाजी केली. तो हळूहळू आपली खेळी रंगवत होता. पण रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव दोघेही उसळत्या चेंडूवर फटका मारत बाद झाले. त्यानंतर डावाचा रागरंगच बदलला. संयमी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला पण त्याच फटक्याने त्याचा घात केला. त्यामुळे केवळ एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडवॉशिंग्टन सुंदरश्रेयस अय्यर
Open in App