India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली. रोहितने ३ वर्षांनंतर वन डेत शतक झळकावले आणि त्यापाठोपाठ गिलनेही शतक पूर्ण केले. दोघंही लागोपाठ माघारी परतल्यानंतर भारताची धावगती संथ झालेली पाहायला मिळतेय. पण, रोहित व शुभमन यांनी आजचा दिवस गाजवला.
आधी बोलावले, मग मागे पाठवले; विराट कोहलीने न ऐकल्यासारखे केले अन् इशानला बाद व्हावे लागले, Video
रोहित शर्मा ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर बाद झाला. शुभमन गिल ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतला. विराटही फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही आणि तो ३६ धावांवर बाद झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"