Rohit Sharma Flopped In India vs New Zealand ODI Series : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेतही अपयशी ठरला. रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रोहित १३ चेंडूत २ चौकारांसह ११ धावा करून माघारी फिरला. ज्या षटकात विकेट मागे एक झेल सुटला त्याच षटकात तो झेलबाद होऊन परतला. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जकारी फॉल्क्सने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या दोन सामन्यातही तो स्वस्तात अडखळला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकाही सामन्यात तळपली नाही हिटमॅनची बॅट
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मानं कमालीची कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाकडूनही त्याच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले. पण न्यूझीलंडविरुद्ध ३ पैकी एकाही सामन्यात त्याला अर्धशतकापर्यंतही पोहचता आले नाही.
Daryl Mitchell नं सेंच्युरीसह रचला इतिहास! टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
रोहित शर्मा सलग तिसऱ्या सामन्यात ठरला अपयशी
भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत रोहित शर्मा एकदाही ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. तीन सामन्यांत त्याने केवळ ६१ धावा केल्या. वडोदरा येथील पहिल्या वनडेत तो ३८ चेंडूत २४ धावा करून कायले जेमिसनचा शिकार झाला होता. राजकोट येथील दुसऱ्या वनडेत २९ चेंडूत २६ धावा करून तो क्रियस्टन क्लर्कचा शिकार ठरला. इंदूरच्या सामन्यात ३३८ धावांचा पाठलाग करताना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो तिसऱ्या सामन्यातही अपयशी ठरला.
सलामीवीराच्या रुपात सातव्यांदा ओढावली ही नामुष्की
रोहित शर्माच्या नावे सलामीवीराच्या रुपात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सातव्यांदा १०० धावांपेक्षा कमी धावा केल्याचा लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. २०११ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २९ धावा केल्या होत्या. २०१२ आणि २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विरुद्ध तो अनुक्रमे ७८आणि ८८ धावा करु शकला होता. २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९० धावा आणि २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडेत मालिकेत ९३ धावा केल्या होत्या. २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो फक्त ९२ धावा करू शकला होता.
Web Summary : Rohit Sharma struggled against New Zealand, failing to reach a half-century in three matches. He scored only 61 runs, continuing a concerning trend in ODI series as an opener. This marks his seventh such instance.
Web Summary : रोहित शर्मा न्यूजीलैंड के खिलाफ संघर्ष करते हुए तीन मैचों में अर्धशतक तक पहुंचने में विफल रहे। उन्होंने सिर्फ 61 रन बनाए, जो एक सलामी बल्लेबाज के रूप में वनडे सीरीज में एक चिंताजनक प्रवृत्ति जारी है। यह उनका सातवां ऐसा उदाहरण है।