Join us  

IND vs NZ, 2nd Test : केन विलियम्सनला मुंबई कसोटीपूर्वी बसला धक्का; विराट कोहलीला मिळाली मोठी संधी 

दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) याला धक्का बसला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 1:58 PM

Open in App

India vs New Zealand,  2nd Test : कानपूर कसोटीत न्यूझीलंड संघानं पराभव टाळला. टीम इंडियाला 27 षटकांत 4 फलंदाज माघारी पाठवण्यात अपयश आल्यामुळे न्यूझीलंडनं पहिली कसोटी अनिर्णीत राखली. आता दोन्ही संघांच्या नजरा मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीकडे आहेत. ही कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे. पण, या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) याला धक्का बसला आहे आणि त्याला बसलेल्या या धक्क्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला संधी मिळाली आहे.  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेला विराट दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करत आहे.

आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत केनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर सरकला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर कायम आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट 903 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. स्मिथ ( 891), केन ( 888), मार्नस लाबुशेन ( 878) व रोहित ( 805) हे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत.  विराट 775 रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि त्याला दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करून क्रमवारी सुधारण्याची संधी आहे.  न्यूझीलंडचा टॉम लॅथम टॉप टेनमध्ये परतला आहे. लॅथमनं भारताविरुद्धच्या कसोटीत दोन्ही डावांत ( 95 व 52) अर्धशतक झळकावले होते आणि तो पाच स्थानांच्या सुधारणेसह 9व्या क्रमांकावर आला आहे.     श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेनं चार स्थानाच्या सुधारणेसह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला मागे टाकून 7 वे स्थान पटकावले आहे. करुणारत्नेनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 147 व 83 धावांची खेळी केली होती.  भारताचा पदार्पणवीर श्रेयस अय्यर यानं कानपूर कसोटीत 105 व 65 धावांची खेळी करताना अनेक विक्रम मोडले आणि तो क्रमवारीत 74व्या क्रमांकावर आला आहे.    

टॅग्स :आयसीसीकेन विल्यमसनभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App