IND vs NZ, 2nd T20I : रोहित शर्मासाठी चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवलं, बायो-बबल नियम मोडून पोहोचला मैदानावर, Video

India vs New Zealand, 2nd T20I - भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२०सामन्यात चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवून मैदानात धाव घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:55 AM2021-11-20T11:55:41+5:302021-11-20T11:56:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd T20I : Rohit Sharma fan breaches security in Ranchi to touch Indian skipper’s feet, Video | IND vs NZ, 2nd T20I : रोहित शर्मासाठी चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवलं, बायो-बबल नियम मोडून पोहोचला मैदानावर, Video

IND vs NZ, 2nd T20I : रोहित शर्मासाठी चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवलं, बायो-बबल नियम मोडून पोहोचला मैदानावर, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd T20I - भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२०सामन्यात चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवून मैदानात धाव घेतली.  टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा  ( Rohit Sharma) याला भेटण्यासाठी चाहत्यानं मैदानावर शिरण्याचे धाडस केले होते. त्यानं रोहितचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. कोरोना व्हायरसचं संकट अजूनही पुर्णपणे गेलेले नसताना चाहत्याच्या या धाडसानं मैदानावरील खेळाडूही थोडेसे घाबरले. रोहितनं त्या चाहत्याला दूरच राहण्याचा इशारा केला.  

पाहा व्हिडीओ...


भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना फ्रंटसिटवर बसलेल्या न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले. मार्टीन गुप्तील ( ३१), डॅरील मिचेल ( ३१), ग्लेन फिलिप्स ( ३४),  मार्क चॅपमॅन ( २१) आणि टीम सेइफर्ट  ( १३) यांनी योगदान दिले. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं त्याच्या चार षटकांत १९ धावांत १ विकेट घेतली. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.न्यूझीलंडनं ६ बाद १५३ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात भारतानं १७.२ षटकांत हे लक्ष्य पार केले. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. लोकेश ४९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावा केल्या, तर रोहित ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला.  

Web Title: IND vs NZ, 2nd T20I : Rohit Sharma fan breaches security in Ranchi to touch Indian skipper’s feet, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.