IND vs NZ, 2nd ODI : मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात ३००+ धावा करूनही न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांच्या विक्रमी २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. त्यामुळेच भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केला. पण, त्यांनी पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसवले. शिखर धवन व शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिल. दोन अडीच तासांनंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सूर्यकुमार यादवने ग्राऊंड स्टाफसोबत गाडीतून खेळपट्टीवर फेरफटकाही मारला. पण, सामना सुरू कधी होणार...
पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांच्याकडून आज संघाला अपेक्षा असतील.... पहिल्या सामन्यात दोघांना अपयश आले होते. पण, संजू सॅमसनने पाचव्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह चांगली भागीदारी करूनही त्याला पुन्हा बाकावर बसवले गेले. अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे. शार्दूल ठाकूर याला आज वगळले आहे.
शिखर धवन व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला पुन्हा सकारात्मक सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.५ षटकांत २२ धावा फलकावर चढवल्या अन् जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळेच हा सामना थोडा उशीरा सुरू झाला होता. दोन तासांहून अधिक काळ पावसाची बॅटिंग सुरूच होती. दोन अडीच तासानंतर पाऊस थांबला आहे आणि कव्हर्सही हटवले गेले आहेत. 10.15 वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"