IND vs NZ, 1st T20I India Win By 48 Runs Against New Zealand : नागपूरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यातील विजयासह टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी सलामी दिली आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर २३८ धावांसह सर्वोच्च धावसंख्या उभारत विक्रमी डाव साधला. या धावांचा यशस्वी बचाव करत टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने दिलेल्या २३९ धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाकडून ग्लेन फिलिप्सने तुफान फटकेबाजी केली. पण तो बाद झाला अन् टीम इंडियासाठी विजयाचा मार्ग सहज सोपा झाला. न्यूझीलंडच्या संघाला ७ बाद १९० धावांवर रोखत टीम इंडियाने ४८ धावांसह विजय नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या २ षटकात अर्शदीप पाठोपाठ हार्दिकचा जलवा! अन्...
अभिषेक शर्माने स्फोटक फंलंदाजीसह केलेल्या ८४ धावांच्या खेळीसह अखेरच्या षटकात रिंकू सिंह याने अवघ्या २० चेंडूत केलेल्या ४४ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३८ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचा संघ २०० पारच्या लढाईत पुन्हा एकदा अपयशी ठरला. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सलामी जोडी धावफलकावर एक धाव असताना तंबूत परतली होती. अर्शदीप सिंगनं डेवॉन कॉ्न्वेला खातेही उघडून न देता दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यापाठोपाठ दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने रचिन रवींद्रला आपल्या जाळ्यात अडकले. तो ५ चेंडूत १ धाव करुन बाद झाला.
Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड
ग्लेन फिलिप्सचा धमाका, दोघांसोबत अर्धशतकी भागीदारीसह दाखवले तेवर, पण
विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाकडून ग्लेन फिलिप्सची बॅट तळपली. तिसऱ्या विकेटसाठी त्याने टिम रॉबिन्सच्या साथीनं ३० चेंडूत ५१ धावांची भागीदारी रचली. रॉबिन्सन बाद झाल्यावर चॅपमनच्या साथीनं त्याने खेळ पुढे नेला. चौथ्या विकेट्सला फिलिप्स आणि चॅपमन या दोघांनी ४२ चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्स तुफान फटकेबाजीसह टीम इंडियाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जोर लावला. पण शेवटी त्याच्यासह संघ कमी पडला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तो मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने ४० चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची खेळी केली. त्याच्यापाठोपाठ मार्क चॅपमन २४ चेंडूत ३९ धावा करून माघारी फिरला. वनडे मालिका गाजवणारा डॅरिल मिचेल मैदानात आला त्यावेळी टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. तो फक्त २८ धावांवर शिवम दुबेच्या जाळ्यात अडकला. याशिवाट कर्णधार मिचेल सँटनरनं १३ चेंडूत २० धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघाने पुन्हा एकदा २०० पारच्या लढाईत नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत फक्त एकदाच तेही झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध न्यूझीलंडने २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.