Abhishek Sharama World Record : एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड! जे कुणाला नाही जमलं ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं

अभिषेक शर्माच शतकं हुकलं, दोन वर्ल्ड रेकॉर्डसह लुटली मैफिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 21:47 IST2026-01-21T21:44:15+5:302026-01-21T21:47:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 1st T20I Abhishek Sharama Creates History With 2 World Record Fewest Balls To 5000 Runs In Mens T20s Reaching 50 In 25 Or Fewer Balls Most Times In T20Is | Abhishek Sharama World Record : एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड! जे कुणाला नाही जमलं ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं

Abhishek Sharama World Record : एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड! जे कुणाला नाही जमलं ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं

Abhishek Sharama Creates History With 2 World Record : भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नवा इतिहास रचला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरुद्ध स्फोटक फलंदाजी करताना अभिषेक शर्मानं एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. जे आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला जमलेले नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आठव्यांदा हा पराक्रम करत सूर्यासह तिघांना मागे टाकत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

या सामन्यात अभिषेक शर्माने फक्त २२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम केएल राहुल (२३ चेंडू, ऑकलंड २०२०) आणि रोहित शर्मा (२३ चेंडू, हॅमिल्टन २०२०) यांच्या नावावर होता. २२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करताच अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक झळकावण्याचा मोठा विक्रम प्रस्थापित केला. त्याने आठव्यांदा हा पराक्रम केला. यासह त्याने फिल सॉल्ट, सूर्यकुमार यादव आणि एविन लुईस यांना मागे टाकत नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. या तिघांनी प्रत्येकी ७ वेळा हा पराक्रम केला होता.

Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक झळकावणारे फलंदाज

  • ८- अभिषेक शर्मा
  • ७- फिल सॉल्ट
  • ७- सूर्यकुमार यादव
  • ७- एविन लुईस

अर्धशतकानंतरही अभिषेकने आपला धमाका कायम ठेवला. शतकी खेळीसह त्याला किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी होती. पण ८४ धावांवर त्याची खेळी थांबली. त्याआधी ८२ धावा पूर्ण करताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५,००० धावांचा पल्ला गाठला.   तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. अभिषेकने केवळ २,८९८ चेंडूंमध्ये ही कामगिरी नोंदवली आहे. या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलच्या नावे होता.  रसेलने २,९४२ चेंडूंमध्ये ५,००० धावा पूर्ण केल्या होत्या. हा वर्ल्ड रेकॉर्डही अभिषेक शर्मानं मोडीत काढला आहे. 

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये ५,००० धावा करणारे फलंदाज

  • २,८९८- अभिषेक शर्मा
  • २,९४२ - आंद्रे रसेल
  • ३,१२७- टिम डेविड
  • ३,१९६- विल जॅक्स
  • ३,२३९- ग्लेन मॅक्सवेल

Web Title : अभिषेक शर्मा का दोहरा विश्व रिकॉर्ड: क्रिकेट जगत में तहलका

Web Summary : अभिषेक शर्मा ने नागपुर में न्यूजीलैंड के खिलाफ दो विश्व रिकॉर्ड तोड़े, भारत के लिए सबसे तेज़ टी20 अर्धशतक (22 गेंद) और केवल 2,898 गेंदों में 5,000 टी20 रन तक पहुंचे, आंद्रे रसेल को पीछे छोड़ा। उन्होंने 25 गेंदों से कम में आठ अर्धशतक लगाकर कई खिलाड़ियों को पछाड़ा।

Web Title : Abhishek Sharma's Double World Record Blitz Stuns Cricket World

Web Summary : Abhishek Sharma shattered two world records against New Zealand in Nagpur, achieving the fastest T20 fifty for India (22 balls) and reaching 5,000 T20 runs in just 2,898 balls, surpassing Andre Russell. He also surpassed multiple players with his eighth sub-25-ball half-century.