Join us

IND vs NED: लोकेश राहुलबाबत अम्पायरचा वादग्रस्त निर्णय; तिसऱ्याच षटकात भारताला पहिला झटका 

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:21 IST

Open in App

सिडनी : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारत आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल सामन्याच्या तिसऱ्याच षटकांत वादग्रस्त निर्णयामुळे बाद झाला. तो 12 चेंडूत 9 धावा करून तंबूत परतला. पॉल व्हॅन मीकरेनच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर राहुल एलबीडब्ल्यू बाद झाला. खरं तर हा चेंडू स्टम्प मिस करत असल्याचे उघड झाले. मात्र अम्पायरच्या चुकीमुळे भारतीय संघाला पहिला झटका बसला. 7 षटकांपर्यंत भारताची धावसंख्या 1 बाद 38 एवढी आहे.

भारताने पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. ग्रुप 2 मध्ये बांगलादेशनेही विजयाची नोंद करून सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले होते. आज त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली आणि आफ्रिका 3 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला. आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसामुळेच अनिर्णित राहिला आणि दोघांना एकेक गुण मिळाले होते.  भारताच्या खात्याताच्या 2 गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट 0.050 असा आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२लोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा
Open in App