IND vs NED : आघाडीच्या फळीतील फलंदाजी कोलमडली! मग शिवम दुबे अन् हार्दिक पांड्या जोडी जमली अन्...

आर्यन दत्त याने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडल्यावर टीम इंडिया अडचणीत सापडली होती. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 21:02 IST2026-02-18T20:57:22+5:302026-02-18T21:02:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NED 36th Match ICC T20 World Cup 2026 Shivam Dube Stunning 50 Hardik Pandya Hit Show After Abhishek Sharma Suffers Embarrassing Feat As India Post 193 For 6 | IND vs NED : आघाडीच्या फळीतील फलंदाजी कोलमडली! मग शिवम दुबे अन् हार्दिक पांड्या जोडी जमली अन्...

IND vs NED : आघाडीच्या फळीतील फलंदाजी कोलमडली! मग शिवम दुबे अन् हार्दिक पांड्या जोडी जमली अन्...

IND vs NED 36th Match ICC T20 World Cup 2026 : शिवम दुबेची स्फोटक खेळी आणि हार्दिक पांड्याच्या कडक फटकेबाजीच्या जोरावर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्ससमोर १९४ धावांचे टार्गेट सेट केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. पण टीम इंडियाला ही लढाई दोनशेपारची देखील करता आली नाही. कारण आर्यन दत्त याने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

आघाडीच्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी,  मग शिवम दुबे अन् हार्दिक पांड्या जोडी जमली

अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्याची विकेट घेणाऱ्या आर्यन दत्त यानेच ईशान किशनलाही तंबूचा रस्ता दाखवला. ईशान किशन याने या सामन्यात २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १८ धावांचे योगदान दिले. तिलक वर्मा ३१ (२७) आणि सूर्यकुमार यादव ३४ (२८) बाद झाल्यावर नेदरलँड्सच्या संघाने भारतीय संघाला खिंडीत पकडले आहे, असे वाटत होते. पण शिवम दुबेची बॅट तळपली. त्याला हार्दिक पांड्याने सुरेख साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूत केलेल्या ७६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १९३ धावा लावल्या.

नेदर्लंड्सच्या संघाकडून आर्यन दत्ताची कमाल!

नेदरलँड्सच्या संघाकडून गोलंदाजीत लोगन व्हान बीक याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. पण तो चांगलाच महागडाही ठरला. आपल्या ४ षटकांच्या कोट्यात त्याने ५६ धावा खर्च केल्या. याउलट आर्यन दत्त याने ४ षटकांत फक्त १९ धावा खर्च करून २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या दोघांशिवाय काईल क्लेन याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. 

Web Title : IND vs NED: शीर्ष क्रम विफल, दुबे और पांड्या ने संभाला!

Web Summary : भारत ने नीदरलैंड के खिलाफ 194 रनों का लक्ष्य रखा। शुरुआती झटकों के बाद दुबे और पांड्या की आक्रामक बल्लेबाजी से भारत ने 193/6 का स्कोर बनाया। सलामी बल्लेबाज जल्दी आउट हो गए थे।

Web Title : India vs. Netherlands: Top order fails, Dube & Pandya rebuild!

Web Summary : India set a 194-run target against Netherlands after a shaky start. Dube's explosive innings and Pandya's aggressive batting helped India recover from early wickets, posting 193/6 in their final group match.