IND vs NAM: ईशान किशनचा तडाखा; T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

Ishan Kishan Rohit Sharma, IND vs NAM T20 World Cup 2026: टीम इंडियाने नामिबियावर दणदणीत विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:43 IST2026-02-13T10:38:59+5:302026-02-13T10:43:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ind vs nam t20 world cup 2026 ishan kishan equals rohit sharma record most runs in single over in t20 wc match | IND vs NAM: ईशान किशनचा तडाखा; T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

IND vs NAM: ईशान किशनचा तडाखा; T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

Ishan Kishan Rohit Sharma, IND vs NAM T20 World Cup 2026: गुरुवारी भारत आणि नामिबिया यांच्यातील टी२० विश्वचषक सामन्यात विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनने धमाकेदार खेळी केली. त्याने नामिबियाच्या गोलंदाजांना नाकीनऊ आणले. अवघ्या २० चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. डावाची सुरुवात करताना ईशान किशनने २५४.१७च्या स्ट्राईक रेटने २४ चेंडूत ६१ धावा केल्या. त्याने आपल्या डावात सहा चौकार आणि पाच षटकार मारले. या डावात त्याने एक धमाकेदार कामगिरी करत थेट दिग्गज रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली.

ईशान किशनने कुटल्या एका षटकात २८ धावा

पॉवरप्लेचे शेवटचे षटक नामिबियासाठी जेजे स्मिथने टाकले. या षटकात ईशान स्ट्राईकवर होता. षटकाचा पहिला चेंडू निर्धाव गेला. यानंतर, ईशान किशनने सलग चार चेंडूंवर चार षटकार मारले आणि नंतर शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. अशाप्रकारे त्याने एका षटकात तब्बल २८ धावा केल्या. यासह, ईशान किशन भारतासाठी टी२० विश्वचषकात एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला. तसेच तो रोहित शर्मासोबत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. रोहित शर्माने २०२४च्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कविरुद्ध एका षटकात २८ धावा कुटल्या होत्या. या यादीत भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग अव्वल स्थानावर आहे. त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार मारून ३६ धावा केल्या.


ईशान किशनचा तुफान फॉर्मात

टी२० विश्वचषकासाठी भारताचा संघ जाहीर होण्यापूर्वी, ईशान किशनचे नाव फारसे चर्चेत नव्हते. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याला टी२० विश्वचषकासाठी निवड होण्यास मदत झाली. जेव्हा ईशानचे नाव टी२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी समोर आले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण ईशानला बराच काळ संघाबाहेर ठेवण्यात आले होते. आता त्याला संधी मिळाली असून तो अप्रतिम फलंदाजी करत आहे. प्रथम, त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. ईशानने फक्त ४२ चेंडूत शतक झळकावले. आता, तो विश्वचषकातही प्रभावी कामगिरी करत आहे.

Web Title : IND vs NAM: ईशान किशन ने टी20 में रोहित शर्मा के रिकॉर्ड की बराबरी की!

Web Summary : टी20 विश्व कप में नामीबिया के खिलाफ ईशान किशन की तूफानी पारी, 24 गेंदों में 61 रन बनाए। उन्होंने टी20 विश्व कप में भारत के लिए एक ओवर में रोहित शर्मा के सबसे ज्यादा रन के रिकॉर्ड की बराबरी की। ईशान ने एक ओवर में 28 रन बनाए।

Web Title : Ishan Kishan Equals Rohit Sharma's Record in T20 World Cup!

Web Summary : Ishan Kishan's explosive innings against Namibia in the T20 World Cup saw him smash 61 runs off 24 balls, equalling Rohit Sharma's record for most runs in an over for India in T20 World Cups. He hit 28 runs in one over.