Join us

IND vs ENG: भारतीय संघातून बाहेर होणार विराट कोहली? सिलेक्टर्सना मिळाला 'हा' खतरनाक फलंदाज

विराट कोहली टी-20 मालिकेतून बाहेर झाल्यास, संघाला तिसऱ्या क्रमांकासाठी एका अशा फलंदाजाची गरज भासेल, जो टिकूनही खेळू शकेल आणि लाँग शॉट्सदेखील मारू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 17:27 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहेत. प्रत्येक मालिकेसोबत संघातील खेळाडू बदलले जात आहेत. एवढेच नाही, तर कर्णधारही सातत्याने बदलले जात आहेत. यातच आता संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहलीलाही संघातून बाहेर करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. एवढेच नाही, तर विराटच्या जागी दुसरा खेळाडू घेण्यासाठीही सिलेक्टर्सकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

विराटला संघातून बाहेर करण्यासंदर्भात चर्चा - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज फलंदाज या मालिकेत खेळताना दिसतील. मात्र विराट कोहलीसाठी ही मालिकी अत्यंत महत्वाची असणार आहे. या मालिकेत, विराट कोहलीच्या बॅटमधून धावा आल्या नाही, तर त्याला संघातून बेहेर करण्याची दाट शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रानुसार, सिलेक्टर्स विराटला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अखेरची संधी देत आहेत. जर या मालिकेत तो फ्लॉप ठरला, तर वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघातून बाहेर केले जाऊ शखते.

...तर हा फलंदाज घेऊ शकतो विराटची जागा -विराट कोहली टी-20 मालिकेतून बाहेर झाल्यास, संघाला तिसऱ्या क्रमांकासाठी एका अशा फलंदाजाची गरज भासेल, जो टिकूनही खेळू शकेल आणि लाँग शॉट्सदेखील मारू शकेल. असाच एक फलंदाज भारतीय संघाला मिळाला आहे. या फलंदाजाचे नाव आहे, दीपक हुड्डा. 

दीपक हुड्डाने आपण काय करू शकतो, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त खेळ करत या फलंदाजाने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. यानंतर, आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत हुड्डाने एक जबरदस्त शतकही ठोकले होते. यामुळे तो भारतीय संघात तिसऱ्या  क्रमांकाची जागा भरून काढू शकतो, असे मानले जात आहे. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App