India vs England, 3rd ODI, Pune: भारतीय संघानं इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांना खेळणं खूप कठीण जात असल्याचं दिसून येत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीत काही खास योगदान दिलेलं नसलं. तरी क्षेत्ररक्षणात कोहलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'किंग' कोहलीनं टिपलेल्या एका अफलातून झेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अर्थात झेलच इतका कमाल होता की कोहलीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर अब्दुल रशीदनं सिली मीड ऑफच्या दिशेनं फटका मारण्याचा प्रयत्न केला. तिथं कोहली क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. चित्त्याच्या वेगानं कोहलीनं झेप घेऊन डाव्या हातानं अब्दुल रशीदचा झेल टिपला आणि सर्वच अवाक् झाले. कोहलीनं टिपलेल्या झेलनंतर भारतीय संघातील खेळाडू धावत कोहलीकडे गेले आणि त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं.
भारताच्या ३३० धावाभारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारतीय संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय संघाकडून रिषभ पंतनं सर्वाधिक ७८ धावांची खेळी साकारली. तर सलामीवीर शिखर धवन (६७) आणि हार्दिक पंड्या (६४) यांनी अर्धशतकं ठोकली.