पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?

विराट कोहली हा टीम इंडियाचा भाग नाही, पण इंग्लंड मधील मोहिमेला सुरुवात करण्याआधी त्याने टीम इंडियातील खेळाडूंशी संवाद साधल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:51 IST2025-06-17T17:50:56+5:302025-06-17T17:51:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Virat Kohli Called For A Meeting With Shubman Gill Rishabh Pant And Others In London Spoke To Them For 2 Hours Report | पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?

पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरुवात होत आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याआधी कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल, उप कर्णधार रिषभ पंत यासह संघातील अन्य खेळाडूंची विराट कोहलीच्या लंडन येथील निवासस्थानी मैफिल जमली होती, अशी माहिती समोर येत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

इंग्लंड दौऱ्याआधी रोहित पाठोपाठ विराटनं घेतला होता कसोटीतून निवृत्तीचा निर्णय

इंग्लंड दौऱ्या आधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनंही कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. तो संघाचा भाग नसला तरी आव्हानात्मक कसोटी मालिकेआधी विराट भेट नव्या कॅप्टनसह संघातील खेळाडूंना इंग्लंडमध्ये लगान वसूल करण्यासाठी बळ देणारी ठरू शकते, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसत आहे.

टीम इंडियाशी कनेक्ट झाला विराट कोहली, लंडनच्या निवासस्थानी जमली होती मंडळी

RevSportz च्या एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आलाय की, लीड्सच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्याआधी शुबमन गिल, रिषभ पंतसह संघातील अन्य खेळाडूंना विराट कोहलीनं आपल्या लंडनस्थितीत निवासस्थानी बोलावले होते. इंट्रा स्क्वॉड लढतीनंतर सोमवारी भारतीय संघातील खेळाडूंना सुट्टी होती. याच दिवशी ही भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या भेटीचा नेमका उद्देश काय होता? कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन तास रंगलेल्या गप्पा गोष्टींच्या सत्रात विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्यावरील आव्हानाचा सामना कसा करायचा याच्या काही खास टिप्स नक्कीच दिल्या असतील. 

आव्हानात्मक दौऱ्यात शुबमन गिल छाप सोडणार का?

इंग्लंड दौऱ्यातून भारतीय कसोटीतील नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. इथं फक्त तीन भारतीय कर्णधारांनी कसोटी मालिका जिंकून दिलीये. पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना शुबमन गिल नवा इतिहास रचणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यात इंग्लंडच्या मैदानात शुबमन गिलचा रेकॉर्डही खराब आहे. त्याच्यासमोर बॅटिंगमध्ये धमक दाखवण्याचीही चॅलेंज असेल.

Web Title: IND vs ENG Virat Kohli Called For A Meeting With Shubman Gill Rishabh Pant And Others In London Spoke To Them For 2 Hours Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.