भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले तीन सामने झाले आहेत. प्रत्येक सामन्यातील प्रत्येक दिवसाच्या खेळात गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराने वारंवार मैदानातील पंचांकडे चेंडू बदलण्यासाठी धाव घेतल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या मैदानातील कसोटी सामन्यांसाठी ड्यूक कंपनीचा चेंडू (Dukes Ball) वापरण्यात येत आहे. भारत-इंग्लंड दरम्यान वापरण्यात येणाऱ्या चेंडूच्या खराब गुणवत्तेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर आता चेंडू निर्मात्या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!खराब चेंडूसंदर्भात इंग्लंडच्या माजी जलदगती गोलंदाजानेही केलीये टिका
इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून पहिल्यापासूनच कसोटी मालिकेसाठी ड्यूक चेंडूच्या वापराला पसंती दिली जाते. पण सध्याच्या घडीला जो चेंडू वापरला जात आहे तो चेंडूच्या तुलनेत आधी वापरात येणाऱ्या चेंडूच्या तुलनेत अधिक सॉफ्ट आहे. इंग्लंडच्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत असलेल्या स्टुअर्ड ब्रॉडनंही सध्या वापरण्यात येणाऱ्या चेंडूसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. चेंडूच्या गुणवत्तेसंदर्भात होणाऱ्या टिकेनंतर आता कंपनी अॅक्शन मोडमध्ये आलीये.
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
चेंडूच्या क्वालिटीसंदर्भात कंपनी काय पावले उचलणार?
चेंडू निर्मिती करणाऱ्या कंपनीचे मालक जजोदिया यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चेंडूसंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले आहेत की, चेंडूच्या गुणवत्तेसंदर्भात आम्ही रिव्ह्यू घेत आहोत. चेंडूसाठी चामडे पुरवणाऱ्यांसह इतर सामुग्री ज्यांच्याकडून घेतली जाते त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. जर काही बदल करण्याची गरज असेल तर त्यावरही विचार केला जाईल, अशी माहिती चेंडू निर्मात्या कंपनीच्या मालकाने दिलीये.
बॅझबॉलमुळे चेंडूत बदल
ड्यूक चेंडू आधी अधिक कठीण असायचा. त्यामुळे स्विंग अन् सीमसाठी गोलंदाजांना त्याचा फायदा मिळायचा. पण इंग्लंडच्या संघाने बॅझबॉलची रणनिती आजमावल्यापासून चेंडूत बदल झाल्याचे दिसते. चेंडू अधिक सॉफ्ट असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत इंग्लंडच्या मैदानात फलंदाजी सोपी झालीये.