भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेत १-२ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यातून बाहेर पडला आहे. चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या ताफ्यात दुखापतीचं ग्रहण लागलं असून संघ बदलण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या यासंदर्भात माहिती दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुडघ्याच्या दुखापतीमुळे हा स्टार अष्टपैलू मालिकेतून 'आउट'
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकृत एक्स अकाउंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित दोन्ही सामने खेळणार नाही. तो मालिकेतूनच आउट झाला असून लवकरच तो मायदेशी परतणार आहे.
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
अर्शदीप सिंग चौथ्या कसोटीला मुकणार
बीसीसीआयने अर्शदीप सिंग संदर्भातही अपडेट दिली आहे. मँचेस्टरच्या मैदानात रंगणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो देखील संघ निवडीसाठी उपलब्ध नसेल. नेट्समध्ये सराव करताना साई सुदर्शनचा चेंडू अडवताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखाप तझाली आहे. तो BCCI मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहे.
अंशुल कंबोजची टीम इंडियात एन्ट्री
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २३ जुलै पासून रंगणाऱ्या या सामन्यासाठी उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज अंशुल कंबोज याची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.
पंत अन् आकाश दीपच्या दुखापतीसंदर्भात मात्र मौन
बीसीसीआयने चौथ्या कसोटीआधी नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप यांच्या दुखापतीसंदर्भात अपडेट दिले असले तरी रिषभ पंत आणि आकाशदीपच्या दुखापतीवर मात्र मौन बाळगले आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पंतच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो फक्त बॅटिंग करताना दिसला होता. आकाशदीपही स्नायू दुखापतीनं त्रस्त होता. हे दोघे प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहणार की, त्यांना बाकावर बसवण्याची वेळ येणार तेही पाहण्याजोगे असेल.
चौथ्या कसोटीआधी टीम इंडियात बदल, असा आहे संघ
शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उप कर्णधार/यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव आणि अंशुल कंबोज