Join us

आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

कॅप्टन्सीत बॅटिंग जमेना; इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत कामगिरी आणखी खाली घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:03 IST

Open in App

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० मालिकेतील विजयी धडाका कायम ठेवलाय. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मानं क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली अन् कॅप्टन्सीची माळ सूर्यकुमार यादवच्या गळ्यात पडली. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमधील बादशाहत कायम राखली. पण सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगमध्ये पूर्वीची जादू उरल्याचे दिसत नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण', सुपला शॉटही गायब

सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कॅप्टन होण्याआधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या तीन कर्णधाराच्या अंडर खेळला आहे. एका बॅटरच्या रुपात तो एकदम भारी फंलदाज होता. टी-२० क्रमवारीतही त्याने नंबर वनचा ताज मिरवला. पण आता त्याच्या भात्यातून धावाच होईनात. खांद्यावर कॅप्टन्सीचं ओझं आल्यावर तो अनेक इंनिंग खेळला पण यात तो ना तापला ना त्याचा सुपला शॉट दिसला. मिस्टर ३६० चा टॅग लागलेल्या सूर्याच्या बॅटिंगला जणू ग्रहणच लागलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा तो बॅटिंगमध्ये फोल ठरला. पाच सामन्यात त्याने फक्त २८ धावा काढल्या. यासह त्याच्या नावे लाजिरवण्या विक्रमाची नोंद झालीये. 

कॅप्टन्सीत खराब बॅटिंगमुळे नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत सूर्यकुमार यावच्या भात्यातून फक्त २८ धावा आल्या. यामुळे कॅप्टन्सीतील बॅटिंगमधील कामगिरीत त्याची घसरण झालीये. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवला फक्त २६ धावा करता आल्या होत्या. यासह ८.६६ च्या  सर्वात कमी सरासरीसह धावा करणारा कॅप्टन असा विक्रम त्याच्या नावे झाला होता. यात आता आणखी घसरण झाली असून इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याच्या सरासरीत मोठी घसरण झाली असून तो आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात ५.६० एवढ्या कमी सरासरीसह धावा काढणारा कॅप्टन ठरलाय. 

आघाडीच्या तीन खेळाडूंमध्ये रोहितसह रिषभ पंतचाही लागतो नंबर 

कॅप्टन्सीत सर्वात कमी सरासरीनं धावा काढणाऱ्या भारतीय बॅटरच्या यादीत सूर्यकुमार टॉपला आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत रोहित शर्माचा नंबर लागतो. २०२२ मध्ये रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फक्त ४३ धावा काढल्या होत्या. यावेळी त्याच्या धावांची सरासरी १४.३३ अशी होती. भारतीय संघाचे नेतृत्व करताना बॅटिंगमध्ये कर्तृत्व न सिद्ध करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कॅप््टन्सीत त्याने १४.५० च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. 

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मारिषभ पंत