IND vs ENG T20I Series Full Schedule : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी गमावल्यानंतर भारतीय संघ आता मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ७ जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माचे ( Rohit Sharma) पुनरागमन हा या मालिकेतील महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनामुळे रोहितला कसोटी सामन्यात खेळता आले नव्हते. ८ डिसेंबर २०२१मध्ये रोहितची टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारपदी निवड झाली आणि ७ महिन्यानंतर रोहित प्रथमच परदेशात कर्णधारपद भुषविणार आहे.
फुल टाईम कर्णधार झाल्यापासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही पराभव पत्करावा लागलेला नाही.
- कसोटी क्रिकेट - २ सामने, मोहाली व बंगळुरू, दोन्ही सामन्यांत भारताचा विजय
- वन डे सामने - वेस्ट इंडिजविरुद्धचे तीनही सामने भारताने जिंकले.
- ट्वेंटी-२० - वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर झालेले ६ सामने जिंकले.
रोहित शर्माच्या पुनरागमनाने संजू सॅमसन किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला ट्वेंटी-२० संघातील स्थान गमवावे लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत गायकवाडला संधी मिळाली होती, तर संजूने आयर्लंडविरुद्ध पुनरागमन केले होते. इशान किशन या दोन्ही मालिकेत भारताचा सदस्य होता आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत तो सलामीला खेळला. दीपक हुडाने तिसऱ्या क्रमांकावर दावा सांगितला आहे, आयर्लंडविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.
पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दीनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक
दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उम्रान मलिका
इंग्लंडचा ट्वेंटी-२० संघ - जोस बटलर ( कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, रिचर्ड ग्लीसन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पर्किसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रिस टॉप्ली, डेव्हिड विली.
भारत-इंग्लंड मर्यादित षटकांच्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
( Timing for the India vs England limited over series)
ट्वेंटी-२० मालिका
पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल, रात्री १०.३० वाजल्यापासून
दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन, सायंकाळी ७ वाजल्यापासून
तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज, सायंकाळी ७ वाजल्यापासून
वन डे मालिका
पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल, सायंकाळी ५.३० वाजल्यापासून
दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स, सायंकाळी ५.३० वाजल्यापासून
तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड, दुपारी ३.३० वाजल्यापासून