Join us

टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट

शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर फिरकी घेणारी कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:42 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत मैदानात उतरण्याआधी भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल स्टायलिश अंदाजातील खास फोटोशूटमुळे चर्चेत आहे. व्हाइट जर्सी अन् ब्लॅक रंगातील ब्लेझरमधील नव्या कॅप्टनच्या स्टायलिश लूक दाखवणारे  खास फोटो बीसीसीआयसह शुबमन गिलनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. शुबमन गिलनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवरील एक कमेंट अधिक लक्षवेधी ठरतीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

"५ टेस्टनंतर कमेंट करतो"

Shubman Gill

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० जून पासून लीड्सच्या  हेडिंग्ले स्टेडियमवरील कसोटी सामन्यातून इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शुबमन गिलसाठी ही मालिका अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. याच अनुषंगाने 'मराठी मीम्स अँण्ड ट्रोल्स' नावाच्या अकाउंटवरून शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर फिरकी घेणारी कमेंट उमटल्याचे दिसते. "५ टेस्ट नंतर कमेंट  करतो", (शुबमन गिलनं शेअर केलेल्या फोटोवर उमटलेली प्रतिक्रिया) असे म्हणत कसोटीत असाच रुबाब दिसणार का? असा प्रश्नच या कमेंटमधून उपस्थितीत करण्यात आल्याचे दिसून येते.

WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की

शुबम गिलसमोर दुहेरी चॅलेंज

शुबमन गिल याने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्यातही इंग्लंडमध्ये त्याची आकडेवारी खराब राहिली आहे. संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीसह फलंदाजीत तो कशी कामगिरी करतोय त्याकडे सर्वांच्या नजरा असतील. आतापर्यंत  ३२ कसोटी सामन्यांत गिलने ३५.०५ च्या सरासरीने १,६८३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून ५ शतके आली आहे. इंग्लंडमधील त्याची सरासरी ३० पेक्षा कमी आहे. एवढेच नाही तर इंग्लंड दौऱ्यावर आतापर्यंत फक्त ३ भारतीय कर्णधारच संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या दौऱ्यात त्याच्यासमोर फलंदाजीतील कामगिरी सुधारण्यासह कॅप्टन्सीत स्वत:ला सिद्ध करण्याचे दुहेरी चॅलेंज असेल.  

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५शुभमन गिल