Join us

गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

IND vs ENG Shubman Gill Statement On Lords Test Sledging Controversy :  प्रत्येक संघ परिस्थितीनुसार, वेळेचे नियोजन करत असतो. आम्हीही करतो. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 21:25 IST

Open in App

IND vs ENG Shubman Gill Statement On Lords Test Sledging Controversy :  भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने मँचेस्टरच्या मैदानात रंगणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महत्त्वपूर्ण लढतीसाठी संघाच्या रणनितीसंदर्भातील गोष्टींशिवाय गिलनं लॉर्ड्सच्या मैदानात झॅक क्रॉउली आणि बेन डकेट यांच्यासोबत झालेल्या वादावरही भाष्य केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी जी कृती केली ती खेळ भावनेला धरून अजिबात नव्हती, या गोष्टींवर जोर देत शुबमन गिलनं तिसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात घडलेल्या भांडणाचा प्रसारमाध्यमांसमोर पंचनामा केला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

१०-२० सेकंदाची गोष्ट नव्हती, तर... नेमकं काय म्हणाला गिल?

गिल म्हणाला की, ती १०-२० सेकंदाची नव्हे तर ९० सेकंदाची गोष्ट होती. प्रत्येक संघ परिस्थितीनुसार, वेळेचे नियोजन करत असतो. आम्हीही करतो. पण त्याच्याही एक पद्धत असते. जर चेंडू खेळाडूला लागला अन्फि जिओ मैदानात आल्यामुळे खेळात व्यत्य आला तर ती गोष्ट समजू शकते. पण जाणीवपूर्वक ९० सेकंद वेळ काढण्यासाठी जी कृती करण्यात आली ती खेळ भावेनेच्या विरोधात आहे, अशा आशयाच्या शब्दांत गिलनं लॉर्ड्सच्या मैदानातील प्रकरणावर आपली बाजू योग्य होती, ही गोष्ट मांडलीये.

करुण नायरची 'घरवापसी'! टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाल्यावर दाखला ठेंगा

सलामी जोडीच्या कृतीमुळे तापलेले मैदानातील वातावरण 

लॉ‌र्ड्स कसोटी सामन्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस भारतीय संघाचा डाव आटोपल्यावर इंग्लंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली होती. जवळपास ७ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना दिवसाअखेर अतिरिक्त षटके खेळणं टाळण्यासाठी सलामी जोडी टाइमपास करताना दिसली. परिणामी दोन्ही सलामीवीर आणि भारतीय खेळाडू यांच्यातील वातावरण काही काळ तापल्याचे पाहायला मिळाले होते. 

इंग्लंडचा डाव यशस्वी ठरला, अन्...

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर स्ट्राइकवर असलेल्या झॅक क्रॉउलीनं या खेळाची सुरुवात केली होती. त्यामुळे  शुबमन गिल त्याच्यावर भडकला. इतर भारतीय फलंदाजांनीही राग व्यक्त केला. आपल्या जोडीदाराचा बचाव करण्यासाठी मग नॉन स्ट्राइकवर असलेल्या बेन डकेटही आला. या गोष्टीवरून मैदानातील वातावरण चांगलेच तापले होते. शेवटी इंग्लंडच्या सलामीवीरांचा हा डाव यशस्वी ठरला अन् एका षटकानंतर त्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. शुबमन गिलच्या आक्रमक अंदाजावर खूप चर्चा झाली. अखेर शुबमन गिलनं ती कृती चुकीचीच होती, अन् भांडण्यामागचं कारण हे नियमाला धरून होते, असे सांगत आम्ही नाही तर तेच चुकले, ही गोष्ट स्पष्ट केली. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिल