IND vs ENG : शिवम दुबे की रमणदीप सिंग? टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळेल संधी?

या दोघांना बदली खेळाडूच्या रुपात संघात सामील करुन घेण्यात आले आहे. पण कुणाला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 21:43 IST2025-01-27T21:37:26+5:302025-01-27T21:43:29+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Shivam Dube or Ramandeep Singh who should India playing 11 in 3rd T20I At Rajkot | IND vs ENG : शिवम दुबे की रमणदीप सिंग? टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळेल संधी?

IND vs ENG : शिवम दुबे की रमणदीप सिंग? टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळेल संधी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघात दोन नव्या भिडूंची एन्ट्री झालीये. नितीशकुमार रेड्डी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून आउट झाला असून त्याच्या जागी शिवम दुबेला बदली खेळाडूच्या रुपात भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय रिंकू सिंह देखील दुखापतीमुळे तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळू कणार नाही. त्याच्या जागी रमणदीप सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना राजकोटच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्यासाठी बदली खेळाडूच्या रुपात संघात एन्ट्री झालेल्या दोघांपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. आता या दोघांत कुणाचा नंबर लागणार? कोण पर्याय सर्वात उत्तम ठरेल? याचा अंदाज बांधण्यासाठी एक नजर टाकुयात दोघांच्या आकडेवारीवर...

शिवम दुबे वर्सेस रमणदीप सिंग! टी-२०तील दोघांची आकडेवारी

शिवम दुबे याने आतापर्यंत टीम इंडियाकडून ३३ टी-२० सामने खेळले आहेत. यात २९.८६ च्या सरासरीसह १३४.९३ च्या स्ट्राईक रेटने त्याने ४४८ धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. रमणदीप सिंग यानेही टीम इंडियाकडून पदार्पण केले आहे. पण आतापर्यंत फक्त दोन सामन्यातच त्याला संधी मिळाली आहे. त्यातील एका डावात त्याच्या खात्यात २५० च्या स्ट्राईक रेटनं १५ धावांची नोंद आहे. याशिवाय ६६ टी-२० सामन्यात त्याने २४.६१ च्या सरासरीसह १७२.५० च्या स्ट्राईक रेटने ६४० धावा कुटल्या आहेत.
 
शिवम दुबेकडे अनुभव असला तरी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट होणं मुश्किल; कारण...

शिवम दुबे आणि मरणदीप सिंग यांच्यात तुलना केली तर अनुभवाच्या जोरावर शिवम दुबे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. पण शिवम दुबे हा डावखुरा आहे आणि तो चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माच्या रुपात टीम इंडियात आधीच दोन डावखुरे फलंदाज आहेत. त्यात आघाडीच्या चारमध्येही स्लॉट रिकाम नाही. त्यामुळे शिवम दुबे हा सर्वोत्तम पर्यायाच्या यादीतून आउट होता. 

रिंकूचा परफेक्ट रिप्लेसमेंट ठरेल रमणदीप

रिंकूच्या बदल्यात रमणदीपला संघात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. रिंकू हा तळाच्या फलंदाजीत फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. रमणदीपचे टीृ-२० तील स्ट्राईक रेट १७२.५० च्या घरात आहे. जे शिवम दुबेपेक्षा भारी ठरते. एवढेच नाही तर रिंकूच्या परफेक्ट रिप्लेसमेंटसाठी रमणदीप सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. अतिरिक्त गोलंदाजाच्या रुपातही तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. आता शेवटी संघ व्यवस्थापन कुणाला  संधी देणार? ते पाहण्याजोगे असेल.

Web Title: IND vs ENG Shivam Dube or Ramandeep Singh who should India playing 11 in 3rd T20I At Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.