Join us

IND vs ENG : घरच्या मैदानात टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंडनं अशी केलीये संघ बांधणी

भारत अन् इंग्लंड दोन्ही संघ मोठ्या बदलासह उतरणार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:09 IST

Open in App

England Squad For 1st Test Against India : आयपीएल स्पर्धेनंतर आता भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाविरुद्धच्या लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंड संघाने आपल्या १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या गड्याला ३ वर्षांनी मिळाली कमबॅकची संधी

इंग्लंडच्या संघाकडून जेमी ओव्हरटन ३ वर्षांनी कसोटी संघात कॅमबक करत आहे. त्याने जून २०२२ मध्ये हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड अखेरचा कसोटी सामना खेळला होता. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघात ब्रायडन कार्स, जॅकब बथेल आणि अनुभवी ऑलराउंडर क्रिस वोक्स हे स्टार देखील कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत. या तिघांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडकडून अखेरचा कसोटी सामना खेळला होता. गस एटकिंसन स्नायू दुखापतीमुळे त्रस्त असल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाचा भाग नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना २० जूनला लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर रंगणार आहे.

Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

भारत अन् इंग्लंड दोन्ही संघ मोठ्या बदलासह उतरणार मैदानात

इंग्लंडच्या संघात मागील १८ महिन्यात अनेक बदल झाले आहेत. भारतीय मैदानातील कसोटी मालिकेत ४-१ असा पराभव पत्करल्यावर अनेक दिग्गज खेळाडू संघाबाहेर गेले आहेत. याआधी भारत दौऱ्यावर इंग्लंड संघात दिसलेल्या जेम्स अँडरसन याने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. याशिवाय जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स आणि ओली रॉबिन्सन हे देखील संघाबाहेरच आहेत. दुसरीकडे भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरणार आहे. दोघांनी या दौऱ्याआधी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातून करुण नायरला कमबॅकची संधी मिळाली आहे. कमी अनुभवी खेळाडूंच्या साथीनं शुबमन गिल आपल्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे.

असा आहे पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, क्रिस वोक्स.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ 

शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक/ उप कर्णधार) यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यु ईश्वरन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंगटन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलबेन स्टोक्स