इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक चेंडू त्याच्या हाताच्या बोटला लागला होता. यात संजूचं बोट फॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्टार क्रिकेटरला महिनाभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागणार आहे. त्याची ही दुखापत आयपीएल फ्रँचायझी संघ राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण संजू सॅमसन या संघाचा कर्णधार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL फ्रँचायझी संघासाठी क्रिएट झाला 'आपलेच दात आपलेच ओठ' सीन अशी वेळ
विशेष म्हणजे राष्ट्रीय संघाकडून खेळताना संजूला ज्या गोलंदाजामुळे दुखापत झालीये तो जोफ्रा आर्चर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातच आहे. त्यामुळे मुंबईच्या वानखेडे मैदानात संजू वर्सेस जोफ्रा यांच्यातील लढाईतील दुखापतीमुळे IPL फ्रँचायझी संघ राजस्थान रॉयल्ससाठी 'आपलेच दात आपलेच ओठ' असा काहीसा सीन क्रिएट झाला आहे.
संजू रणजी स्पर्धेतून आउट; IPL पर्यंत रिकव्हर होणार का?
पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, संजू सॅमसनच्या उजव्या हाताचे इंडेक्स फिंगर (तर्जनी बोट) फॅक्चर आहे. या दुखापतीतून सावरुन नेट प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी विकेट किपर बॅटरला जवळपास पाच ते सहा आठवडे एवढा काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. या दुखापतीमुळे १२ फेब्रुवारीला पुण्याच्या मैदानात रंगणाऱ्या केरळ विरुद्ध जम्मू काश्मिर यांच्यातील रणजी क्वॉर्टर फायनलच्या लढतीतही तो खेळू शकणार नाही. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मोहिमेची सुरुवात करायला तो सज्ज असेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. पण प्रॅक्टिसमध्ये पडलेला खंड संघासाठी आणि संजूसाठी अडचणी वाढवणारा ठरू शकतो.
जोफ्रानं ज्याच्या नेतृत्वाखाली खेळायचंय त्यालाच केलं दुखापतग्रस्त
गत वर्षी दक्षिण आफ्रिकेत धमाकेदार कामगिरी करणारा संजू सॅमसन इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरला. त्यात अखेरच्या चेंडूवर जोफ्रा आर्चरनं टाकलेल्या चेंडूवर तो दुखापतग्रस्त झाला. जोफ्राचा जो चेंडू संजूला लागला त्याचा वेग जवळपास १५० kph इतका होता. त्यानंतर संजू सॅमसन याने एक षटकार आणि चौकार मारला पण दुसऱ्या षटकात तो झेलबाद झाला होता. संजूच्या बोटाला सूज आल्यामुळे यष्टीमागची जबाबदारी ध्रुव जेरल सांभाळताना दिसला होता. राजस्थान रॉयल्सच्या संघानं मेगा लिलावात इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजासाठी १२ कोटी ५० लाख रुपये एवढी किंमत मोजली होती. या गड्यानं नॅशन ड्युटीवर असताना आयपीएलमधीलआपल्या कॅप्टनला दुखापत देत आपल्या फ्रँचायझी संघाच टेन्शन वाढवले आहे.