IND vs ENG : रोहित शर्मानं इतिहास रचला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला! 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्माने विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. रोहितने स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 10:26 AM2024-02-04T10:26:34+5:302024-02-04T10:28:43+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Rohit Sharma Creates History Breaks Virat Kohli's Biggest Record in icc world test championship | IND vs ENG : रोहित शर्मानं इतिहास रचला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला! 

IND vs ENG : रोहित शर्मानं इतिहास रचला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्माने विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. रोहितने स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध वइझाग येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 41 चेंडूंचा सामना करत 14 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने दुसऱ्या डावात आतापर्यंत 13 चेंडूत 13 धावा केल्या असून आता त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

रोहितनं कोहलीचा 'विराट' विक्रम मोडला -
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात 7 धावा करताच इतिहास रचला. रोहित शर्माने स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला. विराट कोहलीला मागे टाकून रोहित शर्मा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये 36 सामन्यांच्या 60 डावांमध्ये 39.21 च्या सरासरीने 2235 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या कालावधीत 4 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मधील विराटची सर्वोच्च धावसंख्या 254* एवढी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आता रोहित शर्मा भारताचा टॉप फलंदाज -
भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये 29 सामन्यांच्या 49 डावांमध्ये 49.82 च्या सरासरीने 2242 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 7 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये रोहित शर्माची सर्वोत्तम धावसंख्या 212 एवढी आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडचा फलंदाज जो रूट याच्या नावे आहे. जो रूटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) 49 सामन्यांच्या 89 डावांमध्ये 49.06 च्या सरासरीने सर्वाधिक 4023 धावा केल्या आहेत. या दरम्यान जो रूटनेने 12 शतके आणि 16 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मधील सर्वोत्तम धावसंख्या 228 एवढी आहे.

WTC मध्ये सर्वाधिक धावा बनवणारे भारतीय फलंदाज -
1. रोहित शर्मा- 2242 धावा (49 डाव)
2. विराट कोहली- 2235 धावा (60 डाव)
3. चेतेश्वर पुजारा- 1769 धावा (62 डाव)
4. अजिंक्य रहाणे - 1589 धावा (49 डाव)
 

Web Title: IND vs ENG Rohit Sharma Creates History Breaks Virat Kohli's Biggest Record in icc world test championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.