Rishabh Pant Seen With Wicketkeeping Gloves : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला धक्क्यावर धक्के बसल्याचे पाहायला मिळत आहेत. दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी उर्वरित मालिकेतून बाहेर पडलाय. दुसरीकडे पदार्पणाच्या प्रतिक्षेत असणारा जलगती गोलंदाज अर्शदीप सिंगही दुखापतीमुळे चौथ्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध नसेल. पण आता इंग्लंड दौऱ्यातील मालिकेत पिछाडीवर असणाऱ्या टीम इंडियाला दिलासा देणारे वृत्त समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI नं मोठी अपडेट दिली, पण पंतसंदर्भातील मुद्द्यावर बाळगलंय मौन
रिषभ पंतसंदर्भात BCCI नं जी गोष्ट गुलदस्त्यात ठेवलीये त्यासंदर्भात दिलासा देणारा फोटो समोर आला आहे. चौथ्या कसोटी सामन्या आधी भारतीय संघाने नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंगसंदर्भात मोठी अपडेट दिली. एवढेच नाही तर संघात बदल केल्याचेही जाहीर केले. पण लॉर्ड्सच्या मैदानात बोटाच्या दुखापतीमुळे मैदान सोडणारा पंत चौथ्या कसोटीसाठी फिट आहे का? त्यावर मात्र बीसीसीआयने मौनच बाळगल्याचे दिसले. यासंदर्भात आता सकारात्मक गोष्ट समोर येत आहे.
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
पंतसंदर्भात दिसला 'ऑल इज वेल सीन'
चौथ्या कसोटी सामन्या आधी रिषभ पंतने सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय विकेट किपर बॅटर आणि उपकर्णधाराचा एक फोटो समोर आला असून यात तो विकेट किपिंग ग्लोव्ह्जसह मैदानात सरावासाठी उतरल्याचे दिसून येते. पंतसंदर्भात दिसलेला हा 'ऑल इज वेल सीन' तो फिट असून तो चौथ्या कसोटीसाठी बॅटिंगसह विकेटमागची जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार असल्याचे संकेत देणारा आहे.
विकेट मागे तोच दिसणार
भारतीय संघातील खेळाडूंनी सोमवारी मँचेस्टरच्या मैदानातील सराव सत्रात भाग घेतला होता. रिषभ पंतसह अन्य काही खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतच्या हातात ग्लोव्ह्ज दिसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात जुरेल नाही तर तोच विकेटमागे दिसेल, याची हिंट मिळते.
ध्रुव जुरेलचं नाव आले होते चर्चेत
लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात विकेटमागे जसप्रीत बुमराहचा चेंडू लागल्यामुळे पंत दुखापतग्रस्त झाला होता. बोटाच्या दुखापतीनंतर त्याने दोन्ही डावात बॅटिंग केली, पण विकेटमागे त्याच्या जागी ध्रुव जुरेल उभा राहिल्याचे दिसले. चौथ्या सामन्यात टीम इंडिया पंतला फक्त बॅटरच्या रुपात खेळण्याचं धाडस दाखवणार का? हा मुद्दा चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला पंतच्या दुखापतीमुळे ध्रुव जुरेल प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते.