Join us

WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला

Rishabh Pant Break Rohit Sharma Record : उजव्या पायाच्या बोटा जवळ फॅक्चर असताना डावखुऱ्या युवा बॅटरनं मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 00:45 IST

Open in App

Rishabh Pant Break Rohit Sharma Record :  इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्टर कसोटी सामन्यातील दुसरा दिवसातील तीन पैकी दोन सत्रात भारी खेळ करत इंग्लंडने बाजी मारली. पण दिवसभराच्या खेळात सर्वाधिक चर्चेत राहिला तो रिषभ पंत. पहिल्या दिवसाच्या खेळात ३७ धावांवर 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदानाबाहेर गेलेल्या पंतनं दुसऱ्या दिवसी उजव्या पायाच्या करंगळी जवळील हाड मोडले असताना मैदानात उतरुन अर्धशतकी खेळीसह अनेक विक्रम मोडित काढले. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक ५ वेळा फिफ्टी प्लस धावसंख्येच्या रेकॉर्डसह इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक ९ वेळा हा डाव साधत त्याने धोनीचा विक्रम मोडला. एवढेच नाही तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत रोहित शर्माच्या विक्रमालाही त्याने सुरुंग लावला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

उजव्या पायाच्या बोटा जवळ फॅक्चर असताना डावखुऱ्या युवा बॅटरनं मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकारांसह २ षटकारांचा समावेश होता. या खेळीसह  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावे होता. 

अनिल कुंबळे ते रिषभ पंत! दुखापतीनंतर मैदानात उतरणाऱ्या लढवय्या क्रिकेटर्सची गोष्ट

WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये टॉपला पोहचला पंत

रिषभ पंतनं आतापर्यंत WTC मध्ये २७३१ धावा केल्या आहेत. इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा रोहित शर्मा या यादीत २७१६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० कसोटी सामन्यात त्याने या धावा केल्या आहेत. रिषभ पंतनं ३८ व्या कसोटी सामन्यातच रोहित शर्माला मागे टाकत टॉपला पोहचला आहे. WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली २६१७ धावांसह तिसऱ्या तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार शुबमन गिल २५१२ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जडेजाही या यादीत टॉप ५ मध्ये असून त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत २२३२ धावा केल्या आहेत. २०१८ मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून पंत टीम इंडियाचा प्रमुख भाग राहिला आहे. आतापर्यंत त्याने ४७ कसोटी सामन्यात ८ शतकाच्या मदतीने ३४२७ धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतरोहित शर्माविराट कोहलीशुभमन गिलरवींद्र जडेजा