Join us

IND vs ENG : आता सुट्टी नाय! नॉनस्टॉप क्रिकेट खेळताना दिसणार हे स्टार क्रिकेटर

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी इंग्लंड विरुद्ध धमक दाखवण्याचे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:05 IST

Open in App

IND vs ENG ODI Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका संपली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं ४-१ असा विजय मिळवत पाहुण्यांना धोबीपछाड दिली. या मालिकेनंतर आता भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेसाठी सज्ज आहे. टी-२० मालिकेत टीम इंडियाचा भाग असणारे अनेक चेहरे या मालिकेतही खेळताना दिसतील. एक नजर टाकुयात त्या खेळाडूंवर जे  टी-२० मालिकेनंतर विश्रांती न घेता वनडेसाठी उतरतील मैदानात

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या खेळाडूंना बॅक टू बॅक खेळाव्या लागतील बॅक टू बॅक मॅचेस

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील एक दोन नव्हे तर अनेक चेहरे वनडे मालिकेतही टीम इंडियाचा भाग आहेत. यात  हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुदर आणि मोहम्मद शमी या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. हार्दिक पांड्याने टी-२० मालिकेत सर्वच्या सर्व पाच मॅचेस खेळल्या. त्याने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीत दमदार कामगिरीही करून दाखवलीये. त्याच्याशिवाय अक्षर पटेल हा देखील प्रत्येक टी-२० सामन्यात मैदानात उतरला होता. वनडे मालिकेतही तो भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू असेल. 

या खेळाडूंना थोडी विश्रांतीही मिळाली

टी-२० मालिकेनंतर वनडे मालिकेसाठी टीम इंडियात असणाऱ्या काही चेहऱ्यांना इंग्लंड विरुद्धच्या छोट्या फॉर्मेटमध्ये काही सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. यात अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीचा समावेश आहे. मोहम्मद शमी पाच सामन्यांच्या मालिकेत फक्त दोन सामन्यातच खेळताना दिसला. पहिल्या सामन्यात संघर्ष केल्यावर दुसऱ्या सामन्यात त्याला चांगले यश मिळाले. आता वनडेत तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगलाही पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ब्रेक मिळाल्याचे पाहायला मिळाले  होते. 

अन्य खेळाडू थेट आपयीएलमध्येच उतरतील मैदानात  

इंग्लंड विरुद्धच्या वनडेचा भाग असणारे सर्वजण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचाही भाग आहेत. याव्यतिरिक्त टी-२० मध्ये दिसलेले अन्य चेहरे आता थेट आयपीएलमध्येच मैदानात दिसतील. ज्यात टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे.

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत ,रवींद्र जडेजा.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडहार्दिक पांड्यामोहम्मद शामीअक्षर पटेलवॉशिंग्टन सुंदररवींद्र जडेजा