Join us

खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

लोअर मिडल ऑर्डर बॅटिंगमधील ताकद वाढवण्यासाठी  त्याच्यावर डाव खेळण्यात आला होता. पण हा डाव फसवा ठरलाय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 22:27 IST

Open in App

ENG vs IND Nitish Kumar Reddy Embarrassing Dismissal : बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ज्या गड्यावर भरवसा दाखलला त्याने घोर निराशा केली. फक्त एक धावा करून तो वाईट पद्धतीने बाद झाला. ऑस्ट्रेलियन दौरा गाजवणाऱ्या नितीश कुमार रेड्डीला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलीये. लोअर मिडल ऑर्डर बॅटिंगमधील ताकद वाढवण्यासाठी  त्याच्यावर डाव खेळण्यात आला होता. पण हा डाव फसवा ठरलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पंत पाठोपाठ नितीश कुमार रेड्डी स्वस्तात तंबूत परतला

रिषभ पंतच्या रुपात भारतीय संघाने २०८ धावांवर चौथी विकेट गमावल्यावर नितीश कुमार रेड्डी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण ६ चेंडूत फक्त एक धाव करून तो तंबूत परतला. पंतची विकेट पडल्यावर दुसऱ्याच षटकात क्रिस वोक्सनं इंग्लंडच्या संघाला आणखी एक विकेट मिळवून दिली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना काही कमालीच्या इनस्विंगसह आपल्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना चकवा दिल्याचे पाहायला मिळाले. आधी केएल राहुलला फसवणाऱ्या वोक्सनं नितीश कुमार रेड्डीलाही आपल्या जाळ्यात अडकवले.  

८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला

खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात चेंडू सोडला अन् ...

भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ६१ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर क्रिस वोक्सनं नितीश कुमार रेड्डीला क्लीन बोल्ड केले. वोक्सनं टाकलेला हा नितीश कुमार रेड्डीनं अगदी स्टाईलमध्ये सोडला अन् तो क्लीन बोल्ड झाला. चेंडूचा अंदाज घेण्यात चुकल्यामुळे त्याच्यावर दुर्देवीरित्या विकेट गमावण्याची वेळ आली. आपली विकेट फेकत तो टीम इंडियाचं टेन्शनही वाढवून गेला.

टीम इंडियाचा डाव फसला

पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय लोअर बॅटिंग ऑर्डर सपशेल अपयशी ठरली होती. पुन्हा तो प्रकार घडू नये, यासाठी टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीवर भरवसा दाखवला. नितीश कुमार रेड्डीच्या रुपात पहिल्या डावात एक निर्णय फसल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ