Manoj Tiwary On Shubman Gill Aggressive Like Virat Kohli : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना शुबमन गिलनं धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या दोन सामन्यातील एक सामना जिंकताना फलंदाजीत त्याने खास छाप सोडली. पण लॉर्ड्सच्या मैदानात तो सपशेल अपयशी ठरला. भारतीय संघाच्या लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवामागे कॅप्टनला बॅटिंगमध्ये आलेले अपयश हे देखील एक कारण ठरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माजी क्रिकेटरनं साधला शुबमन गिलवर निशाणा
पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाचा प्रिन्स बॅटिंगमुळे चर्चेत राहिला. पण तिसऱ्या सामन्यात त्याचा आक्रमक अंदाज चर्चेचा विषय ठरला. याच मुद्यावरून माजी क्रिकेटरनं त्याला झापलं आहे. विराट कोहलीच्या तोऱ्यात मैदानात आक्रमक तोरा दाखवल्यामुळे त्याची बॅटिंग गडबडली, असे मत माजी क्रिकेटरनं व्यक्त केले आहे. जाणून घेऊयात कोण आहे तो क्रिकेटर ज्यानं टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलवर साधलाय निशाणा त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
गिल मैदानात किंग कोहलीची कॉपी करतोय
इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी शुबमन गिल इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉउली आणि बेन डकेटवर राग काढताना दिसले. हा मुद्दा मांडत माजी क्रिकेटर मनोज तिवारी याने शुबमन गिलला सुनावले आहे. मैदानात तो विराट कोहलीची कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोपही या माजी क्रिकेटरनं केलाय. एवढेच नाही तर हीच गोष्ट त्याच्या फलंदाजीवर परिणाम करणारी ठरली, असे मतही या क्रिकेटरनं व्यक्त केले आहे.
विराटचा नाद केला अन् बॅटिंगमध्ये वाया गेला
शुबमन गिल मैदान ज्या पद्धतीने वावरत आहे, ते मला अजिबात पटत नाही. याआधी इंग्लंड दौऱ्यावर जे विराट कोहलीनं केले तसेच तोही करायचा प्रयत्न करतोय. पण त्याचा परिणाम मात्र उलटा झाला. आक्रमक अंदाजामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला. IPL मध्ये गुजरात संघाचे नेतृत्व मिळाल्यापासून तो स्वभावाच्या विपरित वागताना दिसतोय, असा उल्लेखही माजी क्रिकेटरनं केला आहे.
आक्रमकता ही विराट कोहलीची जमेची बाजू होती. पण शुबमन गिलला त्याचा फारसा फायदा होणार नाही. याउलट जर तो आपल्या स्वभावानुसार, मैदानात वावरला तर त्याला नक्कीच फायदा होईल, असा काहीसा सल्लाच मनोज तिवारीनं चौथ्या कसोटी सामन्याआधी शुबमन गिलला दिल्याचे दिसते.