भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना गमावल्यामुळे टीम इंडिया मालिकेत १-२ अशा पिछाडीवर आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाने १८१ चेंडूचा सामना करत नाबाद ६१ धावांची खेळी केली. बुमराह आणि सिराज या गोलंदाजांच्या साथीनं त्याने संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. तो शेवटपर्यंत थांबला, पण दुसऱ्या बाजूनं विकेट पडल्या अन् सामना हातातून निसटला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जड्डूच्या प्रयत्नावर प्रश्नचिन्ह, पण गंभीरनं घेतली बाजू
लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात जडेजानं विजयाच्या आशा पल्लवित केल्या असल्या तरी त्याने जोखीम घेऊन आक्रमक फलंदाजी केली असती तर पदरी निराशा पडली नसती, असा सूरही क्रिकेट वर्तुळात उमटल्याचे पाहायला मिळाले. या मुद्यावरुन जडेजाला ट्रोल करणाऱ्यांची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने बोलती बंद केली आहे.
Smriti Mandhana Net Worth : क्रिकेटच्या मैदानातील 'राणी'च्या श्रीमंतीची गोष्ट
या दिग्गजांनी जड्डूच्या फलंदाजीतील उणीव काढली
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर दिग्गज क्रिकेटर्संनी जड्डूच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. धावांचा पाठलाग करताना जडेजाने थोडी आक्रमकता दाखवला पाहिजे होती, असे मत अनेक माजी क्रिकेटर्संनी व्यक्त केले आहे. यात अनिल कुंबळे, सुनील गावसकर, रवीचंद्रन अश्विन आणि सौरव गांगुली या दिग्गजांचा समावेश आहे.
कोच गौतम गंभीरनं दिली शाब्बासकी
चौथ्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयनं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर रवींद्र जडेजावर स्तुती सुमनांचा वर्षाव करताना दिसते. लॉर्ड्स कसोटी बद्दल कोच म्हणतोय की, हा एक अविश्वसनीय साना होता. जडेजाची संघर्षमय खेळी सर्वोत्तम होती. जड्डू भाई फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हा क्षेत्रात सर्वोत्तम देतोय. असा खेळाडू टीम इंडियात आहे, हे आपलं भाग्यच मानतो, अशा शब्दांत गंभीरनं अष्टैपलू खेळाडूच कौतुक केले आहे.