लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानातील रंगतदार झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाला विजयी मिळवून देणारा शोएब बशीर दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या ऑफ स्पिनरची जागा भरून काढण्यासाठी इंग्लंडच्या संघानं आणखी एक मोठा डाव खेळला आहे. जोफ्रा आर्चरनं चार वर्षांनी दमदार कमबॅक केल्यावर आता इंग्लंडच्या संघाने ८ वर्षे संघाबाहेर असलेल्या भिडूवर भरवसा दाखवला आहे. कोण आहे तो खेळाडू ज्याची चौथ्या कसोटी आधी इंग्लंच्या संघात लागलीये वर्णी जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहे तो खेळाडू? ज्याची इंग्लंडच्या संघात ८ वर्षांनी झालीये एन्ट्री ऑफ स्पिनर शोएब बशीरच्या जागी इंग्लंडच्या संघाने उजव्या हाताचा फिरकीपटू लियाम डॉसन याला ताफ्यात सामील करून घेतले आहे. डॉसन याने इंग्लंड संघाकडून ३ कसोटी सामने खेळले असून त्याच्या खात्यात ७ विकेट्स जमा आहेत. या गोलंदाजाने २०१६ मध्ये टीम इंडियाविरुद्धच्या चेन्नईच्या मैदानातील सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या लढतीत त्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या.२०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नॉटिंघम कसोटीत तो शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरीसह सोडलीये खास छाप
लियाम डॉसन हा बऱ्याच वर्षांपासून संघातून बाहेर होता. देशांतर्गत काउंटी चॅपियनशिप स्पर्धेतील दमदार कामगिरीसह त्याने कमबॅक केले आहे. या स्पर्धेत त्याने २.५५ च्या सरासरीसह २१ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत धमक दाखवताना ४४.६६ च्या सरासरीसह त्याने ५३६ धावा काढल्या आहेत.
इंग्लंड संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉउली, लियाम डॉसन, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, क्रिस वोक्स