Join us

'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!

आतापर्यंत केएल राहुलचा फलंदाजीतील क्रमांक फिक्स नव्हता. कोणत्याही क्रमांकावर खेळवा, पण संघात घ्या, हा मंत्र जोपासत तो मिळेल ती जबाबदारी पार पाडताना दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:28 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी आणि स्टायलिश क्रिकेटर लोकेश राहुलनं (KL Rahul) इंग्लंड दौऱ्याची सुरुवात एकदम दमदार केलीये. हेडिंग्ले कसोटी सामन्यातील पहिल्या डावात महत्त्वपूर्ण ४२ धावांच्या खेळीसह दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक झळकावले. पण तरीही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. उर्वरित सामन्यात त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर लोकेश राहुलला डावाची सुरुवात करायला मिळत आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी तो तेवढी मेहनतही घेताना दिसतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

फॅमिलीसोबत वेळ घालवण्यापेक्षा देशाला प्रधान्य , क्लास दाखवणाऱ्या केएल राहुलसंदर्भातील खास गोष्ट

आतापर्यंत केएल राहुलचा फलंदाजीतील क्रमांक फिक्स नव्हता. कोणत्याही क्रमांकावर खेळवा, पण संघात घ्या, हा मंत्र जोपासत तो मिळेल ती जबाबदारी पार पाडताना दिसून आले. ही लवचिकता त्याच्या स्वभावातही दिसून येत आहे. 'बाप-माणूस' झाल्यावर टीम इंडियातील जबाबदारीचं भान ठेवून त्याने जो निर्णय घेतलाय हा त्याचा पुरावाच आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याने स्वत:ला तयार केलंय तेही लाजवाबच. आयपीएल दरम्यान केएल राहुल बाबा झाला. 'बाप-माणूस' झाल्यावर पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि आपल्या लेकीला अधिक वेळ देण्याचा विचार न करता त्याने भारतीय संघाच्या नियोजित मालिकेआधी इंग्लंडला रवाना होऊन सराव सामना खेळण्याचा निर्णय घेतला. फॅमिलीपेक्षा त्याने देशाचा विचार करून घेतलेल्या निर्णयाबद्दल माजी क्रिकेटर आणि दिल्ली कॅपिटल्सचा कोच हेमांग बदानी केएल राहुलचे कौतुक केले आहे. 

KL Rahul Captain, IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय...

केएल राहुलसंदर्भात काय म्हणाला दिल्ली कॅपिटल्सचा कोच?

भारताचा माजी क्रिकेटर आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य कोच हेमाग बदानी याने इंग्लंड दौऱ्यातील केएल राहुलच्या प्रतिबद्धतेबद्दलची खास गोष्ट शेअर करताना या क्रिकेटरनं आपल्या नवजात लेकरापेक्षा देशाला प्राधान्य दिल्याची गोष्ट बोलून दाखवली. हेमांग बदानी याने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, लोकेश राहुल याने सगळ्यात आधी इंग्लंडला पोहचून सरावाला पसंती दिली. त्याचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. आपल्या बाळाला वेळ देण्याचे कारण देत तो इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेवेळी थेट संघात जॉईन होऊ शकला असता. पण त्याने तसे केले नाही. आपल्या नवजात बाळापेक्षा त्याने देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले. ही खूप मोठी गोष्ट आहे, अशा आशयाच्या शब्दांत हेमांग बदानी याने लोकेश राहुलचं तोंडभरून कौतुक केले आहे. 

IPL संपताच टीम इंडियातील अन्य खेळाडूंच्या आधी इंग्लंडला पोहचला होता लोकेश राहुल

IPL स्पर्धेत केएल राहुल हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. या संघाकडूनही त्याने दमदार कमागिरी नोंदवली. संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडल्यावर लोकेश राहुलनं सगळ्यात आधी इंग्लंडच फ्लाइट पकडले. तो भारत 'अ' संघाला जॉईन झाला अन् सराव सामन्यासाठी मैदानातही उतरला. इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल हा संघातील एक अनुभवी खेळाडू आहे. त्याने घेतलेला निर्णय इंग्लंड दौऱ्यातील आव्हान आणि आपल्या जबाबदारीचं तो भान बाळगून आहे, हेच दाखवून देतो. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५लोकेश राहुलअथिया शेट्टी भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड