IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?

जसप्रीत बुमराह हा भल्या भल्या फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करण्यात सक्षम असणारा गोलंदाज आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघात त्याची धास्ती असते. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:05 IST2025-06-19T16:04:13+5:302025-06-19T16:05:36+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Captain Ben Stokes Says England Do Not Fear India Pacer Jasprit Bumrah | IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?

IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारी २० जून पासून सुरुवात होत आहे. लीड्सच्या मैदानातून दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या हंगामाची सुरुवात करतील. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटीच्या नव्या पर्वाची विजयाने सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल. या आव्हानात्मक दौऱ्यात जसप्रीत बुमराह फक्त तीन सामनेच खेळणार आहे. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आम्ही बुमराहला घाबरत नाही...

जसप्रीत बुमराह हा भल्या भल्या फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करण्यात सक्षम असणारा गोलंदाज आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघात त्याची धास्ती असते. पण इंग्लंडच्या कर्णधाराने पहिल्या कसोटी सामन्याआधी बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. आमच्या ताफ्यात जसप्रीत बुमराहची भीती नाही, असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने म्हटले आहे. बुमराह हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज असला तरी तो एकट्याच्या जोरावर टीम इंडियाला जिंकून देऊ शकत नाही, असेही बेन स्टोक्स म्हणाला आहे. 

IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

नेमकं काय म्हणाला बेन स्टोक्स?
 
लीड्सच्या हेडिंग्ले कसोटी आधी बेन स्टोक्सने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बुमराहच्या गोलंदाजीसंदर्भात तो म्हणाला आहे की, "आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने सर्वोत्तम संघाविरुद्ध सामने खेळ असतो. तो एक सर्वोत्तम गोलंदाज आहे. टीम इंडियासाठी तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहे.  पण त्याचा सामना करण्यासाठी आमच्या ताफ्यात अजिबात भीतीचे वातावरण नाही. मला वाटतं एक गोलंदाज एकट्याच्या जोरावर संघाला मालिका जिंकू देऊ शकत नाही. मालिका जिंकण्यासाठी सर्व ११ खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे असते."

इंग्लंड विरुद्ध  जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड
 
जसप्रीत बुमराह हा इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याच्या खात्यात ६० विकेट्स जमा आहेत. इंग्लंडच्या मैदानात ९ कसोटी सामन्यात बुमराहनं ३७ विकेट्स घेतल्या आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंड दौऱ्यावर तो फक्त ३ सामने खेळताना दिसू शकतो. या ३ सामन्यात तो संघासाठी दमदार कामगिरी करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: IND vs ENG Captain Ben Stokes Says England Do Not Fear India Pacer Jasprit Bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.