IND vs ENG Axar Patel Stunning Relay Catch With Shivam Dube : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलमध्ये धावांची अक्षरश: 'बरसात' झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने दिलेल्या विक्रमी २५४ धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पण त्यानंतर जेकॉब बेथल आणि विल जॅक्स या जोडीनं दमदार भागीदारी करत भारतीय संघाचे टेन्शन वाढवणारी खेळी केली. ही जोडी सेट झाल्यावर जो सामना भारताच्या बाजूनं सेट झालाय असं वाटत होते तो इंग्लंडच्या बाजूनं झुकत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
२२ वर्षीय जेकॉब बेथल आणि विल जॅक्स जोडी जमल्यावर वानखेडेच्या स्टेडियमवर जमलेल्या प्रेक्षकांचा कल्ला काही काळासाठी शांततेत बदलला होता. या जोडीच्या जोरावर इंग्लंडचा संघ सामन्यात भक्कम परिस्थितीत पोहचण्याच्या दिशेनं वाटचाल करत होता. पण अक्षर पटेलनं सीमारेषेवर डोळ्याचं पारण फेडणारा क्षेत्ररक्षणाचा नजाराणा दाखवून देत ही जोडी फोडली. अर्शदीपच्या गोलंदाजीवर विल जॅक्सन खेळलेला मोठा फटका त्याने अप्रतिमरित्या अडवला. एवढेच शिवम दुबेन रॅली कॅच पूर्ण केला अन् वानखेडेवर या विकेटचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. जेकब बेथल आणि विल जॅक्स या जोडीनं पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी आणखी काही काळ टिकली असती तर सामना भारताच्या हातून निसटला असता. पण कमालीच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामन्यात ट्विस्ट आले. अक्षर पटेलनं मिळवून दिलेली ही विकेट मॅचचा टर्निंग पाइंटच होती.
Web Summary : In the India-England match, England faltered chasing India's score. A partnership was broken by Axar Patel's amazing relay catch at the boundary, completed by Shivam Dube, sparking celebrations.
Web Summary : भारत-इंग्लैंड मैच में, भारत के स्कोर का पीछा करते हुए इंग्लैंड लड़खड़ा गया। अक्षर पटेल के सीमा रेखा पर अद्भुत रिले कैच से एक साझेदारी टूटी, जिसे शिवम दुबे ने पूरा किया, जिससे जश्न शुरू हो गया।