इंग्लंड आणि भारत यांच्यातील हेडिंग्ले कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल पाठोपाठ दुसऱ्या दिवसाच्या खेळात रिषभ पंतच्या भात्यातूनही शतक पाहायला मिळाले. पण ज्यावेळी "डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरला आपला नंबर आल्यावर छाप सोडण्यात अपयश आले. जवळपास ८ वर्षांनी कसोटीत कमबॅक करणाऱ्या करुण नायरच्या पदरी पहिल्या डावात भोपळा पदरी पडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
द्विशतकवीर खाते न उघडता शून्यावर फिरला माघारी
करुण नायरनं २०१६ मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. इंग्लंड लायन्सविरुद्ध द्विशतकी खेळीसह त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले. पण बाहेर जाणाऱ्या चेंडूवर खेळलेला फटका अन् ओली पोपनं घेतलेल्या अप्रतिम कॅचमुळे तो फक्त चार चेंडू खेळून खातेही न उघडता तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
ओली पोपनं सर्वोत्तम कॅचसह करुण नायरचा खेळ केला खल्लास
कर्णधार शुबमन गिल शतकी खेळी करून तंबूत परतल्यावर करुण नायर त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला. भारताच्या पहिल्या डावातील १०५ व्या षटकातील बेन स्टोक्सच्या ऑफ स्टंप बाहेरील लेंथवर टाकलेल्या चेंडूवर करूण नायरनं मोठा फटका खेळला. जो त्याच्या खेळीच्या शैलीच्या अगदी विपरित होता. शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डिंग करणाऱ्या ओली पोपनं हवेत उडी मारुन अफलातून झेल घेत करुण नायरचा खेळ खल्लास केला.
४ विकेट्स अन् इंग्लंडच्या नावे दुसऱ्या दिवसातील पहिले सत्र
शुबमन गिल १४७ धावांवर बाद झाल्यावर करुण नायरनं चार चेंडू खेळून विकेट फेकत स्वत:ला सिद्ध करण्याची पहिली संधी गमावली. त्याच्यापाठोपाठ रिषभ पंतही १३४ धावांवर बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या रुपात बेन स्टोक्सनं टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. मजबूत स्थितीत दिसणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात ९५ धावांत ४ विकेट्स गमावल्यामुळे इंग्लंडच्या संघाने हे सत्र आपल्या नावे केल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IND vs ENG After A Seven Year Wait For A Test Return Karun Nair Goes For A Duck Ollie Pope Take Brilliant Catch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.