Join us

Yashasvi Jaiswal LBW : इंग्लंडचा 'यशस्वी' रिव्ह्यू! जैस्वाल इनस्विंग चेंडू खेळण्यात अयशस्वी, अन्...

मैदानातील पंचांनी नॉटआउट दिल्यावर इंग्लंडच्या कर्णधाराने शेवटच्या क्षणी घेतला रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:42 IST

Open in App

IND vs ENG 5th Test Yashasvi Jaiswal LBW Wicket : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावातील चौथ्याच षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् मैदानातील पंचांना बदलावा लागला आपला निर्णय

सरे क्लबकडून खेळणारा गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) याने घरच्या मैदानात मिळालेल्या संधीच सोनं करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याचा अप्रतिम इनस्विंग चेंडू खेळण्यात यशस्वी चुकला अन् पायचितच्या रुपात त्याने आपली विकेट गमावली. मैदानातील पंचांनी नॉट आउट दिल्यावर इंग्लंडचा नवा कर्णधार ओली पोपनं अखेरच्या क्षणी रिव्ह्यू घेतला अन् यशस्वी रिव्हूसह मैदानातील पंचांनी आपला निर्णय बदलत यशस्वी जैस्वालला बाद ठरवले. ओली पोपच्या कॅप्टन्सीतील हा पहिला यशस्वी रिव्ह्यू देखील ठरला.  

IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल

एका शतकासह एक अर्धशतक अन् दोन वेळा पदरी पडला भोपळा

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत यशस्वी जैस्वाल याने शतकी खेळीसह दमदार सुरुवात केली होती. लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात यशस्वीनं पहिल्या डावात १५९ चेंडूत १०१ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात तो अवघ्या ४ धावांवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. बर्मिंगहॅमच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ८७ (१०७) आणि दुसऱ्या डावात त्याने २८ (२२) धावांची खेळी केली. लॉर्ड्सच्या कसोटीत पहिल्या डावात १३ आणि दुसऱ्या डावात खातेही न उघडता तो तंबूत परतला. मँचेस्टर कसोटी सामन्यात पहिल्या डावात ५८ धावांची खेळी केल्यावर दुसऱ्या डावात त्याच्या पदरी भापळा पडला होता.  

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघ