Join us

IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

Kumar Dharmasena Controversy, IND vs ENG 5th Test: कुमार धर्मसेना यांनी मैदानात नेमकं काय केलं.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 21:21 IST

Open in App

Kumar Dharmasena Controversy, IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत पाचवी कसोटी सुरू होण्याआधीच वाद सुरु झाले होते. पिच क्युरेटर आणि भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील वाद साऱ्यांनीच पाहिला. त्यानंतर आता शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आणखी एक वाद निर्माण झाला आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मैदानावरील पंच धर्मसेना यांचा एक निर्णय वादग्रस्त ठरला. धर्मसेना यांच्यावर इंग्लंडला मदत केल्याचा आरोप आहे.

कुमार धर्मसेना यांनी नेमके काय केले?

पहिल्या सत्रात जोश टंगच्या चेंडूवर साई सुदर्शनविरुद्ध एलबीडब्ल्यूची अपील करण्यात आली होती. परंतु धर्मसेना यांनी त्याला नॉट आऊट घोषित केले. या निर्णयादरम्यान, त्यांनी असे काही केले, जे वादग्रस्त ठरले आहे. भारतीय डावाच्या १३ व्या षटकात, जोश टंगने फुल-टॉस बॉल टाकला. त्या चेंडूवर साई सुदर्शनविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील करण्यात आले. हा बॉल खेळताना सुदर्शन खाली पडला. इंग्लंडच्या खेळाडूंच्या अपील दरम्यान, धर्मसेना यांनी एक अँक्शन केली, जी वादग्रस्त ठरली. सुदर्शनला नाबाद घोषित करताना, धर्मसेना यांनी सूचित केले की चेंडू सुदर्शनच्या पॅडवर लागण्यापूर्वी बॅटला लागला होता. त्यानंतर, इंग्लंडच्या खेळाडूंनी डीआरएस घेतला नाही.

---

धर्मसेना यांनी चिटींग केल्याचा चाहत्यांचा आरोप

या घटनेनंतर सोशल मीडियावर धर्मसेना यांच्याविरुद्ध चिटींगचे आरोप होऊ लागले. चाहत्यांनी दावा केला की धर्मसेना यांनी इंग्लिश खेळाडूंना चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क असल्याचे सांगितले. क्रिकेटमध्ये डीआरएसची सुविधा असते, तेव्हा इंग्लिश खेळाडू ते घेऊ शकतात. जर धर्मसेना यांनी त्यांना एज लागल्याचे सांगितले नसते, तर इंग्लिश खेळाडूंनी रिव्ह्यू घेतला असता आणि त्यांचा रिव्ह्यू वाया गेला असता. त्याचा कदाचित टीम इंडियाला फायदा होऊ शकला असता. पण धर्मसेना यांनी जाणीवपूर्वक इंग्लिश संघाला मदत केली, असा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघव्हायरल फोटोज्व्हायरल व्हिडिओइंग्लंड