Join us

IND vs ENG : ठरलं! अर्शदीप Playing XI फिक्स! कुलदीप शेवटपर्यंत बाकावरच बसणार!

ओव्हलच्या पाचव्या अन् अखेरच्या सामन्याआधी कर्णधार शुबमन गिलनं दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 21:08 IST

Open in App

IND vs ENG Test 5th Arshdeep Singh’s Test Debut No Kuldeep Yadav In Indias Playing XI : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत कोण बाजी मारणार? ते पाचव्या आणि अखेरच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या निकालावर ठरणार आहे. यजमान इंग्लंडचा संघ मालिकेत २-१ अशा आघाडीवर असून भारतीय संघ शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मैदानात उतरेल. 

कुलदीप टीम इंडियाच्या प्लॅनिंगचा भागच नाही

इंग्लंडच्या संघाने प्रमुख फिरकीपटू लियाम डॉसन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी अनुकूल असावी, यामुळेच त्याचा पत्ता कट झाल्याचे दिसते. त्यांच्या ताफ्यात एकही फिरकीपटू नाही. पण गरज पडल्यास आमच्याकडे वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा उपलब्ध आहेत, असे गिल म्हणाला. त्याचं हे वक्तव्य कुलदीप यादवला इंग्लंड दौरा बाकावरच बसून मायदेशी परतावे लागणार हे स्पष्ट होते.

कुलदीप यादवची डाळ काही शिजणार नाही, कारण...कुलदीप हा मॅचला कलाटणी देणारा गोलंदाज आहे. पण इंग्लंडच्या मैदानातील सामन्यात शुबमन गिल किंवा संघ व्यवस्थापनाला एकदाही त्याला संधी द्यावी असे वाटले नाही. बॅटिंग मजबूत करण्याच्या उद्देशाने वॉशिंग्टन सुंदर आणि जड्डूच्या रुपातच दोन फिरकीपटूला टीम इंडिया पसंती देताना दिसते. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडअर्शदीप सिंगकुलदीप यादवशुभमन गिल