Join us

IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

२१ व्या शतकात दुसऱ्यांदा असं घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:30 IST

Open in App

Shubman Gill Loss All Tosses In 5 Match Test Series : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कॅप्टन बदलला पण टॉस वेळी भारतीय कर्णधार शुबमन गिलचं नशीब काही बदलले नाही. इंग्लंड दौऱ्यावरील पाचव्या कसोटी कसोटी सामन्यातही टॉस वेळी त्याच्या पदरी निराशा आली. मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात टॉस गमावल्यावर शुबमन गिल आता विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून भारतीय संघाने मागील १५ सामन्यात एकही टॉस जिंकलेला नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

२१ व्या शतकात दुसऱ्यांदा असं घडलं

इंग्लंड दौऱ्यातून शुबमन गिलनं कॅप्टन्सीच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. फलंदाजीत त्याने धमक दाखवली. पण नाणेफेकीच्या वेळी तो प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात चौदाव्या वेळी पाच सामन्यांच्या मालिकेत एखाद्या कर्णधाराने पाचही सामन्यात टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले. २१ व्या शतकात टॉस वेळी कमनशिबी ठरलेला शुबमन गिल दुसरा कर्णधार ठरला आहे. याआधी विराट कोहलीवर अशी नामुष्की ओढावली होती. 

IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल

याआधी इंग्लंड दौऱ्यावरच किंग कोहलीवर आली होती अशी वेळ

२०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीवर अशीच वेळ आली होती. भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो एकदाही नाणेफेकीचा कौल जिंकला नव्हता. मागील १३ कसोटी मालिकेत सर्वच्या सर्व सामन्यात टॉस गमावल्यावर तीन संघांनी कसोटी मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे. याशिवाय एका संघाने या परिस्थितीत मालिका जिंकल्याचाही रेकॉर्ड आहे. इंग्लंडच्या संघाने १९५३ मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेतील एकाही सामन्यात टॉस न जिंकता मालिका जिंकली होती.

ओव्हलच्या मैदानातील मागिल ७ सामन्यात टॉस जिंकणाऱ्या संघाने केली गोलंदाजी

इंग्लंडच्या लंडन येथील ओव्हलच्या मैदानातील मागील ७ कसोटी सामन्यात ज्या संघाने टॉस जिंकला त्यांनी गोलंदाजीला पसंती दिली आहे. २०२३ पासून या मैदानात प्रथम श्रेणी सामन्यातही टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलविराट कोहली