IND vs ENG 5th Test, Day 3 Rohit Sharma At Oval : लंडन येथील ओव्हलच्या मैदानातील भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या अन् अखेरच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीसह रोहित शर्माही चर्चेत आला. भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार टीम इंडियाला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर पोहचल्याचे पाहायला मिळाले. स्टेडियममधील त्याची कडक एन्ट्री अन् टीम इंडियाला सपोर्ट करतानाची खास झलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितची कडक एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर रोहित शर्मा ओव्हल स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी पोहचला. स्टेडियममधील एन्ट्री वेळी काही चाहत्यांनी हिटमॅन रोहितसोबत सेल्फी घेतल्याचेही पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
...अन् रोहितच्या चेहऱ्यावर यशस्वी शतकाचा आनंदही दिसला
मालिका वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने शतकी खेळी करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्याच्या या शतकी खेळीनंतर रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा होता. त्याची ही खास झलक दाखवणारा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यशस्वी जैस्वालनं इंग्लंडविरुद्ध चौथे शतक साजरे करताना रोहित शर्माला मागे टाकले. रोहितनं १३ कसोटी सामन्यात सलामीवीराच्या रुपात इंग्लंडविरुद्ध ४ शतके झळकावली होती. यशस्वीनं १० व्या सामन्यातच हा पल्ला गाठला आहे. बीसीसीआयनेही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन रोहित शर्माचे खास फोटो शेअर केले आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी अचानक घेतली होती कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्याआधी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो कसोटीतील शेवटचा सामना खेळला. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता तो फक्त वनडेत खेळताना दिसणार आहे. वनडेतून मैदानात कमबॅक करण्याआधी ओव्हलच्या मैदानात त्याने टीम इंडियाचा सामना पाहण्याचा आनंद घेतला.
Web Title: IND vs ENG 5th Test Rohit Sharma Attendance on Day 3 of the Oval Decider IND vs ENG 5th Test Pics And Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.