IND vs ENG 5th Test Rohit Bhai Messaged Me Yashasvi Jaiswal Says After Century : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या ओव्हल कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालच्या भात्यातून टीम इंडियाला मालिकेत कमबॅकची आस निर्माण करणारे शतक आले. पहिल्या डावात अवघ्या २ धावांवर तंबूचा रस्ता धरलेल्या यशस्वीनं अपयश भरुन काढताना कठीण खेळपट्टीवर अविस्मरणीय खेळी साकारली. १६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने त्याने दुसऱ्या डावात ११८ धावांची खेळी केली. शतकी खेळीनंतर यशस्वीनं मैदानातूनच माजी कर्णधार रोहित शर्मासोबत 'इशारों इशारों में... ' झालेल्या खास संवादाचा किस्सा शेअर केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"इशारों इशारों में..."
जैस्वालची यशस्वी खेळी पाहण्यासाठी रोहित शर्माही ओव्हलच्या स्टेडियमवर हजेरी लावली होती. मैदानात तगडी फलंदाजी करत असलेल्या यशस्वीला माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मानं स्टेडियम स्टँडमधून खास संदेश दिला होता. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर खुद्द यशस्वीनं त्यावर भाष्यही केले. तिसऱ्या दिवशी युवा बॅटर फलंदाजी करत असताना "इशारों इशारों में..." रोहित शर्मानं त्याच्याशी संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातील प्रश्नावर यशस्वी म्हणाला की, मी रोहित भाईला पाहिलं अन् त्याला हाय म्हणालो.. यावर त्याच्याकडून खेळत राहा असा मेसेजमिळाला." असे यशस्वी म्हणाला.
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
इथं कस लागणार याची कल्पना होती, त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो
यशस्वी जैस्वालनं इंग्लंड दौऱ्यातील लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. त्यानंतर मोठी खेळी करण्यात अडखळलेल्या युवा बॅटरनं मालिकेची शेवट क्लास सेंच्युरीसह केला. या खेळीबद्दल तो म्हणाला की, मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत होतो. खेळपट्टी आव्हानात्मक होती. इंग्लंडमध्ये खेळताना अशा खेळपट्टीवर खरी कसोटी असते याची कल्पना होती. इथं खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या मी तयार होतो. कोणता शॉट कसा खेळायचा ते माहित होतं, अशा शब्दांत त्याने तयारी केली त्याचं फळं मिळाल्याची गोष्ट बोलून दाखवली.