IND vs ENG 5th Test, Dhruv Jurel or N Jagadeesan Both Players Stats And Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण दुखापतीमुळे रिषभ पंत उर्वरित सामन्याला मुकणार आहे. मँचेस्टरच्या मैदानात सामन्यात बरोबरी साधल्यावर आता टीम इंडियासमोर मालिका बरोबरीत राखण्यासाठी ओव्हलच्या मैदानातील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेट किपर बॅटरच्या रुपात कुणाला संधी मिळणार? हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतच्या जागी टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री, पण...
भारतीय संघाने रिषभ पंतच्या जागी विकेट किपर बॅटरच्या रुपात एन जगदीशन याला संघात सामील करून घेतले आहे. संघात लेट एन्ट्री झाल्यावर या नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी मिळेल, अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसते. पण आधीपासून संघात असलेल्या ध्रुव जुरेल पंतच्या जागेसाठी पहिला दावेदार असेल.
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
बाकावरच बसला, पण पंतच्या जागी विकेट किपिंग करताना दिसला
ध्रुव जुरेल हा टीम इंडियातील अन्य खेळाडूंच्या आधी इंग्लंड दौऱ्यावर पोहचला होता. भारत 'अ' संघाकडून त्याने इंग्लंड लायन्स विरुद्धच्या कसोटी सामन्यात बॅटिंगमधील धमकही दाखवली. पण पंत असल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही स्थान मिळाले नाही. लॉर्ड्स पाठोपाठ मँचेस्टरच्या मैदानात पंतच्या दुखापतीनंतर विकेट किपिंगची जबाबदारी ही ध्रुव जुरेलच्या खांद्यावर येऊन पडली. दोन कसोटीत फक्त फिल्डिंग करणाऱ्या या गड्याला पाचव्या सामन्यात तरी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पसंती मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.
एक नजर ध्रुव जुरेल अन् एन जगदीशन यांच्या कामगिरीवर
ध्रुव जुरेल याने आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले असून ४०.४० च्या सरासरीसह त्याने २०२ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेस आहे. विकेट मागे त्याने ६ झेलसह आणि दोघांना यष्टिचित केले आहे. दुसऱ्या बाजूला नारायण जगदीशन कसोटीत पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. एन जगदीशन याने ५२ प्रथम श्रेणी सामन्यात ३३७३ धावा आणि १३३ झेल टिपले आहेत. याशिवाय १४ फलंदाजांना त्याने यष्टिचित केल्याचाही रेकॉर्ड आहे.