Join us

IND vs ENG Live 5th Test Match : उजवे गेले, डावे राहिले...! Sam Billings च्या फ्लाईंग कॅचने टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले, Video 

India vs England Test Match Live : मालिकेत २-१ अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला २००७नंतर इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. पण,

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:10 IST

Open in App

India vs England Test Match Live : मालिकेत २-१ अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला २००७नंतर इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. पण, आजपासून सुरू झालेल्या पाचव्या कसोटीत त्यांचा खेळ पाहता, भारतीय चाहत्यांची चिंता वाढली आहे. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली व श्रेयस अय्यर हे आघाडीचे पाचही फलंदाज जेम्स अँडरसन व मॅथ्यू पॉट्स या दोन गोलंदाजांनी माघारी पाठवले. त्यात यष्टिरक्षक सॅम बिलिंग्स ( Sam Billings) याने टिपलेला अफलातून झेल, टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला.   

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत गिल व पुजारा ही जोडी ओपनिंगला आलेली. गिलचे सुरेख फटके पाहून ही जोडी कमाल करेल असे वाटले होते, परंतु इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने धक्के दिले. त्याने गिलला १७ धावांवर माघारी पाठवले, त्यानंतर पुजारालाही १३ धावांवर बाद केले.  हनुमा विहारी सावध खेळत होता. पण, २३व्या षटकात मॅथ्यू पॉट्सने त्याला ( २०) पायचीत केले.  २५व्या षटकाच्या दुसरा चेंडू खेळावा की सोडावा या संभ्रामवस्थेत विराट गेला. तो बॅट मागे घेणार त्याआधीच चेंडू बॅटवर आदळून यष्टींवर आदळला...

विराट १९ चेंडूंत ११ धावांवर बाद झाला आणि भारताला  ७१ धावांवर चौथा धक्का बसला. अँडरसनने दिवसाची तिसरी विकेट घेताना श्रेयस अय्यरला ( १५) बाद केले. भारताचा निम्मा संघ ९८ धावांवर तंबूत परतला. बिलिंग्सने डाव्याबाजूने जाणाऱ्या चेंडूवर झेप घेत श्रेयसची विकेट मिळवून दिली. आता रिषभ पंत व रवींद्र जडेजा ही डावखुरी जोडी भारताची खिंड लढवतेय...  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतश्रेयस अय्यररवींद्र जडेजाजेम्स अँडरसन
Open in App