Join us  

रोहितने हे काय केलं, सर्फराज खानचं का नाही ऐकलं? सामन्यात घडलं असं काही की...

इंग्लंडने पाचव्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण कुलदीप यादवने गेम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 12:56 PM

Open in App

India vs England 5th Test Live update ( Marathi News ) :  इंग्लंडने पाचव्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी सावध सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा इंग्लंडच्या सलामीवीरांनी चांगला समाचार घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटू कुलदीप यादवला आणले आणि त्याने पहिल्या सत्रात भारताला दोन यश मिळवून दिले. तिसरी विकेटही मिळाली असती, परंतु सर्फराज खानचे ( Sarfaraz Khan ) याचे न ऐकणे महागात पडले. 

'ये बढेगा आगे... बढेगा...'; ध्रुव जुरेलचं अचूक भाकित अन् भारताला मिळाली मोठी विकेट, Video 

कुलदीपने त्याच्या पहिल्याच षटकात बेन डकेटला ( २७) माघारी पाठवले. गुगलीवर पुढे येऊन डकेटने मारलेला चेंडू हवेत बराच उंच गेला आणि शुबमन गिलने अप्रतिम परतीचा झेल पकडला. क्रॉली मैदानावर उभा राहिला आहे. कुलदीपने पुन्हा एकदा गुगलीवर इंग्लंडला धक्का दिला. पुढे येऊन फटका मारण्याचा ऑली पोपचा प्रयत्न फसला आणि तो १४ धावांवर यष्टीचीत झाला. लंच ब्रेकनंतर कुलदीपला आणखी एक यश मिळाले असते.

झॅक क्रॉली टीम इंडियाचे टेंशन वाढवताना दिसतोय आणि २६व्या षटकात कुलदीपच्या चेंडूवर क्रॉलीचा शॉर्ट लेगला सर्फराज खानने भन्नाट झेल घेतला होता. त्याने जोरदार अपील केले, परंतु मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले. सर्फराजने DRS साठी रोहितकडे हट्ट धरला होता. शुबमन गिलचेही तेच मत होते, परंतु रोहितने यष्टीरक्षक जुरेलला विचारले. त्याने नकार देताच रोहितने DRS घेतला नाही. पण, नंतर जेव्हा रिप्ले दाखवला गेला, त्यात क्रॉलीच्या बॅटशी चेंडूचा संपर्क झाल्याचे दिसले. रोहितने जर सर्फराजचे ऐकले असते तर भारताला मोठे यश मिळाले असते. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडकुलदीप यादवसर्फराज खानरोहित शर्मा