'ये बढेगा आगे... बढेगा...'; ध्रुव जुरेलचं अचूक भाकित अन् भारताला मिळाली मोठी विकेट, Video 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघात पाच युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:26 PM2024-03-07T12:26:46+5:302024-03-07T12:27:44+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Live Update Day 1 Marathi : DHRUV JUREL told Kuldeep Yadav 'He will step out and next ball he stumped Pope'; Video. | 'ये बढेगा आगे... बढेगा...'; ध्रुव जुरेलचं अचूक भाकित अन् भारताला मिळाली मोठी विकेट, Video 

'ये बढेगा आगे... बढेगा...'; ध्रुव जुरेलचं अचूक भाकित अन् भारताला मिळाली मोठी विकेट, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test Live update ( Marathi News ) :  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघात पाच युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. रजत पाटीदार वगळल्यास सर्फराज खान, आकाश दीप व ध्रुव जुरेल यांनी प्रभावी कामगिरी केली. देवदत्त पड्डिकलला धरमशाला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली आहे. ध्रुवने ना केवळ फलंदाजीतच नव्हे, तर यष्टींमागेही चमकदार कामगिरी करून रिषभ पंतच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधील त्याचा दावा मजबूत केला आहे. ध्रुवने आजही यष्टींमागे कमाल केली आणि त्याने केलेलं भाकित खरं ठरलं.

कुलदीप यादवने धक्का दिला, शुबमन गिलने २० यार्ड पळून भन्नाट झेल घेतला, Video


इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी सावध खेळ करताना जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा चांगला सामना केला. कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून देताना बेन डकेटला ( २७) माघारी पाठवले. शुबमन गिलने अप्रतिम परतीचा झेल पकडला आणि इंग्लंडला ६४ धावांवर पहिला धक्का बसला. पण, क्रॉली मैदानावर उभा राहिला आणि ६६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ऑली पोप व क्रॉली यांच्यात ताळमेळ चुकल्याने रन आऊटची संधी निर्माण झाली होती, परंतु यशस्वी जैस्वाल धडपडला आणि त्याला वेळेत चेंडू फेकता नाही आला.


कुलदीप यादवच्या गुगलीवर पुढे येऊन फटका मारण्याचा ऑली पोपचा प्रयत्न फसला आणि तो १४ धावांवर यष्टीचीत झाला. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडला १०० धावांवर २ धक्के बसले. पोपची विकेट पडण्यापूर्वी जुरेल म्हणाला होता की हा पुढील चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न करेल आणि तसेच झाले. 

ध्रुवचे वडील नेम सिंह भारतीय सैन्यात होते आणि १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांनीही पाकिस्तानला पराभूत करण्यात योगदान दिले होते. ध्रुवनेही सैनिक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आठवीत असताना ध्रुवचे क्रिकेटशी नाते जोडले गेले आणि त्याने मागे वळून नाही पाहिले. मग ध्रुवच्या वडीलांनीही आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.  

Web Title: IND vs ENG 5th Test Live Update Day 1 Marathi : DHRUV JUREL told Kuldeep Yadav 'He will step out and next ball he stumped Pope'; Video.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.