Join us

IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल

यापुढे कधीच बुमराहची तुलना ऑस्ट्रेलियाच्या त्रिकूटाशी करु नका, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 20:25 IST

Open in App

Fans Troll Jasprit Bumrah For Taking Rest From Oval Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या  कसोटी सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगला आहे. मालिका बरोबरीत राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात भारतीय संघ चार बदलासह मैदानात उतरला. इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह फक्त ३ सामने खेळणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. पण मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया वर्कलोड मॅनेजमेंटसंदर्भातील निर्णय बदलून त्याला मैदानात उतरेल, अशी अपेक्षा होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्लेइंग इलेव्हनमधून OUT झाल्यावर बुमराह झाला ट्रोल

मॅच आधी शुबमन गिलनंही खेळपट्टी पाहून स्टार गोलंदाजाला खेळवायचं की, नाही यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळेच बुमराह सलग दुसरा सामने खेळेल, अशी अपेक्षा होती. पण शेवटी टीम इंडिया त्याच्याशिवायच मैदानात उतरली. ही गोष्ट भारतीय क्रिकेट चाहत्यांना चांगलीच खटकली आहे. सलग दोन सामने खेळू शकत नसेल, तर बुमराहने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना पाहायला मिळत आहे. काहींनी तर IPL चा दाखला देत जसप्रीत बुमराहला ट्रोल केल्याचे दिसते. 

IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

जसप्रीत बुमराहनं BCCI च्या मेडिकल टीमच्या सल्लामुळं घेतलीये विश्रांती

जसप्रीत बुमराहने अधिक काळ टीम इंडियासोबत राहावे, या उद्देशाने BCCI मेडिकल टीमनं त्याला ठराविक सामने खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार, जसप्रीत बुमराहला इंग्लंड दौऱ्यावर फक्त ३ सामने खेळवण्यात येणार असल्याची भूमिका संघ व्यवस्थापनानेही स्पष्ट केली होती. पण चाहत्यांना ही गोष्ट खटकली आहे. बुमराहला पाचव्या कसोटी सामन्यात विश्रांती दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी जलदगती गोलंदाजाला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

IPL चा दाखला देत बुमराहवर निशाणा

Bumrah Troll

एका वापरकर्त्याने IPL चा दाखला देत जसप्रीत बुमराहवर निशाणा साधला आहे. IPL मध्ये चांगले पैसे मिळतात त्यामुळे तिथं तो सलग १४ सामने खेळतो. पण देशासाठी तो सलग २ सामनेही खेळू शकत नाही, असे म्हणत बुमराहवर निशाणा साधला आहे. IPL मध्ये बुमराह सुरुवातीपासून MI फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसते. यंदाच्या हंगामात दुखापतीतून सावरल्यावर तो प्रत्येक सामन्यात संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. 

बुमराहची तुलना ऑस्ट्रेलियांच्या त्रिकूटाशी करु नका, कारण...

यापुढे जसप्रीत बुमराहची तुलना कधीच ऑस्ट्रेलियन जोश हेजलवूड, पॅट कमिन्सन आणि मिचेल स्टार्क या स्टार गोलंदाजांशी करू नका. तसं करणं म्हणजे त्या गोलंदाजांचा अपमान होईल. कारण ज्यावेळी संघाला गरज असते त्यावेळी ते उपलब्ध असतात. बुमराहबाबत मात्र तसं चित्र दिसत नाही, अशा आशयाच्या शब्दांत एकाने बुमराहच्या विश्रांतीवर तिखट प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळते. एकाने तर जमत नसेल तर बुमराहनं निवृत्ती घ्यावी, असे मत व्यक्त केले आहे.

'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं सोडली साथ

Bumrah Troll

ओव्हलची खेळपट्टी ही पहिल्या चार सामन्यांतील खेळपट्टीच्या तुलनेत जलगती गोलंदाजांवर मेहरबान होणारी आहे. जसप्रीत बुमराह या मैदानात अधिक घातक ठरू शकला असता. इंग्लंडमधील खेळपट्टीचा बदलले रंग पाहून अनेकांना बुमराहला न खेळवण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटत आहे. टीमचा विचार करून पंतला मोडक्या पायाने फलंदाजी करायला लावणाऱ्या मंडळींना बुमराहला विश्रांती का दिली? हा प्रश्न पडला तर तो चुकीचाही नाही.

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ